Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून मुख्याध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परीषद शाळेतील मुख्यध्यापक सुभाष सोनवणे या शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रुखांच्या जाचाला कंटाळून शाळेतच गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या शिक्षकाचे प्राण वाचले.
याबाबतचे वृत्त असे की, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मुख्यध्यापक सुभाष सोनवणे यांना वारंवार त्रास दिला जात होता. गत आठवड्यात त्यांना तीन नोटीसाही शिक्षण विभागाने बजावल्या होत्या. त्यांना वारंवार पंचायत समितीत बोलावून घेवून तासंनतास ताटकळत ठेवत असल्याचे सदर शिक्षकांच्या मित्रपरीवारात चर्चा आहे.

मुख्यापक सोनवणे शाळेत उशिरा आल्यावरून तसेच दोन आठवड्यापुर्वी एका पदाधिकार्‍याने या शाळेत जावून सोनवणे यांना दोन तास शाळेच्या गेटबाहेर उभे केल्याचेही काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे मुख्यध्यापक सोनवणे हे प्रचंड नैराश्यात होते. त्यातुनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. दरम्यान सोनवणेयांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला असता अशा प्रकारची कुठलीही घटना झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. विनाकारण वावड्या उठविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी श्री. वाघिरे यांच्या संपर्क केला असता, ते म्हणाले मी शिर्डी येथे सरपंच परीषदेच्या कामात व्यस्त असून याबाबत मला काही माहिती नाही. यया प्रकारणाची माहिती घेतो असे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!