गुडगाव : फोर्टिस हॉस्पिटलने दिली 25 लाखांची ऑफर : आद्याचे वडील जयंत सिंह

0

गुडगावमधील फोर्टिस हॉस्पिटलकडून डेंग्यूच्या उपचारासाठी सात वर्षाच्या मुलीच्या आई-वडिलांच्या हातात तब्बल 16 लाखांचे बिल सोपवण्यात आले होते.

डेंग्यूच्या उपचारासाठी 16 लाख रुपयांचं बिल आकारले. डेंग्यूचे उपचार करूनही तसंच पूर्ण बिल भरुनही सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे.

कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने 25 लाखांची लाच दिल्याचा दावा मुलीचे वडील जयंत सिंह यांनी केला आहे.

मुलीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे फोर्टिस हॉस्पिटल हे प्रकरण दडपण्याचा आणि आपल्या चुका लपवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

LEAVE A REPLY

*