पुणे विद्यापीठाची आज सिनेट निवडणूक : नाशिक जिल्ह्यात 21 केंद्रावर मतदान

0
नाशिक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आज निवडणूक होणार आहे. नाशिकसह पुणे व नगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या या निवडणुकीत एकता व प्रगती पॅनलच्या उमेदवारांसमोर जयकर ग्रुपप्रणीत विद्यापीठ विकास मंडळाच्या उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सिनेट निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 27 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सिनेटसाठी यंदा तिरंगी लढत होत असून, प्रस्थापितांच्या पॅनलसमोर प्रथमच परिवर्तनवादी तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या जयकर ग्रुपप्रणीत विद्यापीठ विकास मंडळाच्या उमेदवारांचे आव्हान उभे राहिले आहे. विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलकडून एकूण दहा उमेदवारांत नाशिकच्या तिघांचा समावेश आहे.

त्यांचे प्रतिस्पर्धी प्रगती पॅनलकडून दहा उमेदवारांमध्ये नाशिकचे उमेदवार असून, जयकर ग्रुपप्रणीत विद्यापीठ विकास मंडळातर्फे पदवीधर गटात एक सदस्य निवडणूक लढवत आहे.

या निवडणुकीसाठी नाशिक शहरात 6 मतदान केंद्र असून, के. के. वाघ महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय आणि नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय येथे मतदान केंद्र असून, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक केंद्र असे एकूण 21 केंद्रांवर ही मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणो, नगर आणि नाशिकमध्ये सुमारे 5 हजार मतदारांनी नोंदणी केली असून, या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील जवळपास दहा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे आहेत नाशिकचे उमेदवार : नाशिकमधून व्यवस्थापन गटात अशोक सावंत, तर पदवीधरमध्ये चार सदस्य रिंगणात आहे. एकता पॅनलकडून खुल्या गटात नाशिक जिल्ह्यातून मविप्रचे सभासद डॉ. तानाजी वाघ, तर राखीव गटातून मविप्रच्या तीसगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पडवी (एस.टी.), व्ही. एन. नाईक संस्थेकडून विजय सोनवणे (एन.टी.) हे उमेदवार आहे.

प्रगती पॅनलकडून व्ही.एन.नाईक संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांचे नातू हेमंत दिघोळे (एन.टी.)गटातून उमेदवारी करत आहेत, तर जयकर ग्रुपप्रणीत विद्यापीठ विकास मंडळाकडून नाशिकमधून बाकेराव विठोबा बस्ते हे खुल्या गटातून उमेदवारी करत आहे.

LEAVE A REPLY

*