यवतमाळच्या दुर्घटनेमुळे विक्रेत्यांना कीटकनाशके फवारणीचे धडे

0
अमहदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात यवतमाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून औषधे विक्रेत्यांना कीटनाशके सुरक्षित फवारणी संदर्भात धडे देण्यात येत आहेत.
राज्य कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतात कीटकनाशके व तणनाशके फवारतांना काळजी घेण्यासंदर्भात तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
कालअखेर राहुरी, नगर, श्रीगोंदा, अकोले, संगमनेर व जामखेड तालुक्यांतील विक्रेत्यांना धडे देण्यात आले. आज 12 ऑक्टोबर रोजी पारनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शेतात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशके फवारतात. फवारताना मुख्यत 3 प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. कीटकनाशकांचे अत्ंयत बारीक कण हवेतून श्‍वासोच्छवासासोबत शरीरात जातात.
फवारणी करताना त्वचेच्या संपर्कातून अथवा डोळ्यामधून शरीरात जातात. न कळत धूम्रपान करताना तोंडाव्दारे विष शरीरात जाऊ शकते.
त्यामुळे किटनाशके वापरताना शेतकर्‍यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती विके्रत्यांनमार्फत पोहोचविण्यासाठी तालुकानिहाय औषधे विकेत्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
बुधवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात नगर शहर व तालुक्यातील औषधे विके्रत्यांची कार्यशाळा पार पडली.
यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील राठी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी बोराळे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*