सेल्फीच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू

0
नाशिकरोड | गणेश विसर्जनासाठी गेलेल्या नाशिकरोड येथील तरुणाचा दारणा नदीपात्रात सेल्फी काढण्याच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आई वडिलांसमोर ही घटना घडली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळते आहे. 

दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर सोनार (वय २४, रा. बनकर मळा, चेहेडी शिव, सिन्नर फाटा) हा युवक गणेश विसर्जनासाठी दारणा नदीकाठी आपल्या आई वडिलांसोबत गेला होता.

सेल्फी काढण्यासाठी तो पाण्यात शिरला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो नदीपात्रात बुडाला. घटनेची माहिती अग्निशमनदल आणि पोलिसांना मिळताच त्याचा शोध घेण्यात आला.

अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. महापालिका व पोलीस प्रशासनाने सावधानता बाळगण्याचे आवाहन केलेले असतांनादेखील ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*