उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिम : कृषी अवजारे लाभार्थ्याची निवड सोडत पद्धतीने होणार

0
त्र्यंबकेश्वर | तालुक्यातील उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि औजारे लाभार्थ्याची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक  २० जून रोजी त्र्यंबकेश्वर येथे सोडत होणार असल्याने तालुका कृषी अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात उन्नत शेती – समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत १४२ शेतकर्यांनी अनुदानावर अवजारे मिळण्यासाठी अर्ज केले असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या लक्षांकाच्या मर्यादे मुळे तालुका हा घटक मानुन सोडत पद्धतीने लाभार्थी निवड मंगळवार (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालयात दुपारी तीन वाजता उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शेतक-यांना स्वतःच्या हक्काचे कृषि यंत्रसामुग्री औजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन  देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि औजारे अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. त्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातून शेतक-यांनी ट्रॅक्टर-६८. रोटाव्हेटर-१२.मळनी यंत्र-१५. भात लावणी-८. भात मळणी-१५. भात मील-१०. दाल मिल-१४. या प्रमाणे औजारे अनुदानावर मिळण्या कामी अर्ज केले आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांना अवजारे 35 ते 50 टक्के अनुदानावर देण्यासाठी लाभार्थींची निवड पारदर्शक होण्यासाठी सोडत पद्धतीने लाभार्थी निवड   निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बॅंक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.

अजय सूर्यवंशी¸ तालुका कृषी अधिकारी. त्र्यंबकेश्वर आगामी काळात कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्याची गरज असल्याने कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुधारित  अवजारांचा वापर होण्यासाठी अनुदानावर अवजारे वाटप करण्यात येत आहे.

त्यानुसार अनुदानाच्या अवजारे घेण्यासाठी तालुक्यातून १४२ अर्ज प्राप्त झाले असल्याने अनुदान मर्यादे मुळे पारदर्शक निवड होण्यासाठी सोडत पद्धतीने शेतकरी निवड करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*