परदेश दौर्‍यासाठी शेतकर्‍यांची 17 रोजी निवड

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदाच्या वर्षासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची परदेश दौर्‍यासाठी 17 ऑक्टोबर रोजी ड्रॉ पध्दतीने निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी दिली.
31 ऑगस्टअखेर पर्यंत जिल्ह्यातील 299 शेतकर्‍यांनी प्रस्ताव दाखल केले होते. जिल्हास्तरावर झालेल्या छाननीत 39 शेतकर्‍यांचे अपात्र ठरले. दरम्यान 33 शेतकर्‍यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
संबंधित शेतकर्‍यांना त्रुटींची पुर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे.अन्यथा सोडत पध्दतीमध्ये त्या शेतकर्‍यांना मुकावे लागणार आहे.
अभ्यास दौर्‍यासाठी पात्र अर्जाची सोडत पध्दतीने निवड केल्यानंतर शेतकर्‍यांची ज्येष्ठता क्रमवारी निश्‍चित करून यादी तयार करण्यात येणार आहे.
सदरची यादी विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वाजता सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*