मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना थेट जनतेतून निवडून द्या

0

मधुकरराव पिचड : राष्ट्रवादीचा सरकारच्या विरोधात धिक्कार मोर्चा

अकोले (प्रतिनिधी) – यापुढील मुख्यमंत्री व पंतप्रधान सुद्धा जनतेतून निवडून द्या, म्हणजे सरकारला कळेल की खरी लोकशाही काय आहे. 6 लाख शेतकरी हे बोगस आहे असे सांगणारे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीच बोगस आहे.
आज सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, कामगार, विद्यार्थी सरकारच्या धोरणाला कंटाळला आहे. हे सरकार शेतकरी विरुद्ध आहे, नालायक लोक एकत्रित येऊन मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे अशी घणाघाती टीका राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केली.
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालय येथे आयोजित केंद्र व राज्य सरकारच्याविरुद्ध धिक्कार मोर्चात माजी मंत्री पिचड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, अकोले तालुका एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे , सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, नगराध्यक्ष के. डी. धुमाळ,
अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, अगस्ती कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख, रामनाथ वाकचौरे, सुरेश गडाख, राजेंद्र डावरे, सुनील दातीर, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, प्रवीण धुमाळ, बाळा नवले, बाजार समितीचे उपाध्यक्ष भरत देशमाने, संचालक दिलावर शेख, नगरसेवक सचिन शेटे, बाळासाहेब वडजे,
नामदेव पिचड, परशराम शेळके, युवक चे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले, तालुकाध्यक्ष शंभू नेहे, विठ्ठलराव डुंबरे, भाऊसाहेब कासार, राहुल बेनके, अंकुश थोरात, सुनील कोटकर, अरुण शेळके, कासम मणियार, अरुण माळवे, विजय लहामगे, राहुल देशमुख, तुषार सुरपुरीया, नाजीम शेख, जावेद जहागीरदार, अन्सार पठाण, निलेश चौधरी, आयुब तांबोळी, विजय पवार, महेश वैद्य,
संपतराव कोटकर, बाळासाहेब वैद्य, चंद्रकांत पवार, साईनाथ नवले, महिपाल देशमुख, राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कुमोदिनी पोखरकर, तालुकाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, शहराध्यक्षा कल्पना सुरपुरिया, पं. स.सदस्य माधवी जगधने, सौ.गोंदके, युवती तालुकाध्यक्षा शितल तिकांडे, शहराध्यक्षा किर्ती गायकवाड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, उपाध्यक्ष बाबासाहेब वाकचौरे, बाजार समितीचे माजी सभापती सुधाकर देशमुख, रावसाहेब वाळुंज, भाऊसाहेब कासार, गणेश पापळ, मच्छिन्द्र पापळ आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिचड म्हणाले की, आज कधी नव्हे इतके विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शेत मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असून हे सरकार फुकट खाऊ लोकांचे आहे. राज्यातील 800 इंजिनियरींग कॉलेज बंद पडले असून अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.
जीएसटी आणि नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणूस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेठीस धरला जात असून पंतप्रधान मनमानी पद्धतीने देश चालवत असल्याचा आरोप त्यांनी ह्या वेळी केला. आज गरिबाच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नसून शिक्षणातही श्रीमंताची मक्तेदारी होत आहे. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. अकोले तालुक्यातील विकास कामांना सरकारकडे पैसे नाही, सरकार मनमानी व सुलतानी पद्धत्तीने कारभार करत आहे .
आमदार वैभवराव पिचड म्हणाले की सरकारला शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाशी काही घेणे नसून हे सरकार उद्योगपती आणि शेटजी यांचे आहे. महात्मा गांधीच्या पांढर्‍या टोपीने देशासह जगाला शांततेची शिकवण दिली या उलट दुसरीकडे काळी टोपी घालून 10 लाखांचा सुट घालून फिरणारे विचार कुठं. जाती जातीत तेढ निर्माण करून देश मोडित काढण्याचे हे षडयंत्र सुरू आहे.
अनेक दिवसांपासून तालुक्यातील जनतेच्या मनात असलेली खदखद व या सरकार विरूद्धचा रोष आज धिक्कार मोर्चाच्या रुपाने समोर आला आहे. या सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. युपिए सरकारच्या काळात शरद पवारांनी एकही कागद न मागता सोसायट्यांकडून माहिती मागवून सरसकट कर्जमाफी केली. नेते शरद पवार व राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष प्रत्येकवेळी शेतकरी अडचणीत आल्यावर धावून आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, विकास शेटे, कु. अश्विनी काळे, कु.माधुरी जाधव, गंगाराम धिंदळे, काळू भांगरे आदींची भाषणे झाली. सुमारे 3 तास चाललेल्या ह्या धिक्कार मोर्चात अनेक कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

  धिक्कार मोर्चात  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  डोक्यावर गॅस टाक्या  घेऊन सरकारविरोधात विविध घोषणा दिल्या. उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी यांनी बळीराजाचा वेश परिधान करून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. बैलगाड्या, घोडे, ट्रॅक्टर  व त्यावर विविध फळ भाज्या घेऊन हा मोर्चा मराठी शाळेच्या प्रांगणातून अकोले शहरातून कोल्हार – घोटी रस्त्याने तहसील कचेरीवर नेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*