कृषीकडून शेतकर्‍यांच्या बांधावर बियाणे : जिल्ह्यात 547 प्रकल्प, पेरणीला वेग

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यात पीकनिहाय 547 प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यापार्श्‍वभूमिवर कृषी विभागाने शेतकर्‍यांना शेताच्या बांधावर बियाणे वाटप सुरू केले आहे. पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकर्‍यांनी पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

बाजरी, सोयाबीन, मका, तूर, मुग व उडीद आदी पीकांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत पीक प्रात्यक्षिके शेतकर्‍यांच्या शेतामध्ये राबविण्यात येत आहे. यापूर्वी पीक प्रात्यक्षिकांसाठी लागणार्‍या निविष्ठा शासनामार्फत खरेदी केल्या जात. याशिवाय प्रात्यक्षिकांचे क्षेत्र 100 हेक्टर होते. एवढ्या मोठ्या विखुरलेल्या क्षेत्रावर प्रकल्प राबविताना कृषी सहाय्यकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, शेतकर्‍यांशी दैनदिन संवाद साधने व तंत्रज्ञान प्रसारामध्ये अडचणी निर्माण होत होत्या.त्यामुळे यंदापासून पीक प्रात्यक्षिक 10 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणार आहे. 2022 पर्यत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.त्या संकल्पपूर्तीसाठी यंदाच्या खरीप व रब्बी हंगामापासून उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रमुख पीकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता व अनुवांशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करून शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पादन प्राप्त करून देणे.तसेच पीक विमा योजनेंतर्गत जास्तीत-जास्त शेतकर्‍यांना सहभागी करून नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांच्या होणार्‍या नुकसानीपासून शेतकर्‍यांना संरक्षित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या मोहिमेतंर्गत चालू वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून निश्‍चित करण्यात येत आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक् उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिने पीकांची उत्पादकता त्यांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणे, पीकांचे वैविध्यीकरण करणे, पीकांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाजार भावातील नियमित चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकर्‍यांना अवगत करून देणे, शेती पुरक व्यवसायांना चालना देणे, बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्यादृष्टिने राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपन्याव्दारे शेतकर्‍यांचे संघटन करणे, कंपन्यांची व्यावसायिक क्षमता बांधणी करणे, काढणी पश्‍चात शेतमाल हाताळणी व मूल्यवर्धन करणे आदी बाबींवर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक पंडीत लोणारे यांनी दिली.

पेरणीवेळी कृषी सहाय्यक शेतात
गावनिहाय पीक प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर आहे. त्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले.एका हंगामात प्रत्येकाकडे साधारण दोन व खरीप, रब्बी, उन्हाळी हंगाम मिळून 5 प्रात्यक्षिकांची जबाबदारी आहे. सध्या खरीपाची पेरणी सुरु असून प्रकल्प राबविण्यात येणार्‍या शेतावर शेतकर्‍यांना पेरणीवेळी बीजप्रक्रीयेची माहिती देण्यासाठी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काही प्रामाणिक कृषी सहाय्यक उपस्थित राहून स्वत:हा प्रात्यक्षिक करुन दाखवित आहेत.

तालुका व पिक निहाय प्रकल्प संख्या
खरीप ंहगाम 2017 मध्ये प्रात्यक्षिकांचे तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून नियोजित पीक व प्रकल्पामध्ये बाजरी, सोयाबीन, मका , तूर, मूग व उडीद या पिकांचे प्रकल्प आहे. एकूण प्रकल्प: नगर-88, पारनेर-32, पाथर्डी-11, कर्जत-23, जामखेड-62, श्रीगोंदा-12, श्रीरामपूर-17, राहुरी-37, नेवासा-67, शेवगांव-31, संगमनेर-54, कोपरगाव-54, राहाता-68 व अकोले- 23 आदी 547 प्रकल्प असून त्यासाठी 610 कृषी सहायक कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

*