शेतकरी संपाचा दुसरा दिवस : बागलाणमध्ये गाड्या अडवल्या, येवल्यात १४४ कलम लागू, आंदोलकांना घेतले ताब्यात

0

नाशिक : कालपासून शेतकरी राज्यव्यापी संपावर गेले आहेत. अनेक ठिकाणी दुध, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

अनेक परिसरात आज दुध व भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे तर अनेक दुकानदारांनी पाट्या लिहित दुधाला आज सुट्टी, भाजीपाला आज बंद अशा पाट्या लिहून ठेवल्या आहेत.

आज नाशिक जिल्ह्यात सकाळपासून शेतकरी संपाचा जोर वाढलेला दिसून आला. जिल्ह्यातील सय्यद पिंपरी भागात दुधाचा कंटेनर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला.

शिवरे फाटा येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असतांना पोलिसांनी असंख्य शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव होता.

येवला- पिंपळगाव जलाल परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

सटाण्याच्या जायखेडा इथे रात्री गुजरातला जाणाऱ्या कांद्याच्या गाड्या शेतकऱ्यांनी अडवून कांदा रस्त्यावर फेकला.

निफाडला आमदार अनिल कदम यांची प्रशासकीय अधिकार्यासमवेत चर्चा झाली यात त्यांनी सांगितले शेतकऱ्यावर लाठीचार्ज करू नका

मनमाड, येवला, लासलगावमध्ये आज भाजीपाल्याची गाडी आली नाही

निफाड : निफाड कडकडीत बंद

पालखेड मिरचिचे (ता.निफाड) : मुख्यमंत्री, माधव भंडारी, रावसाहेब दानवे यांची संतप्त शेतकऱ्यांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मनमाड : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी ही उतरले रस्त्यावर, संतप्त शेतकऱ्यांनी मनमाडला पुणे-इंदौर महार्गावर रास्ता रोको करून दूध ओतले रस्त्यावर यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

वणी : वणीत भाजीपाला विक्रेते ही संपात , भाजी मंडईत शुकशुकाट

 

LEAVE A REPLY

*