करोनाग्रस्ताच्या संपर्कातील १३ जण विलगीकरण कक्षात; रुग्णाची प्रकृती उत्तम

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

शहरात आढळून आलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कातील १३ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. शहरातील मनोहरनगर येथे सोमवारी करोना पाँजिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा तसेच महापालिक‍ेच्या आरोग्य विभगाने तातडीने त्याचे कुटुंबिय व त्याच्या अधिक संपर्कातील १३ सदस्यांना विलगिकरण कक्षात हलवले आहे. यामध्ये रुग्णाच्या कुटुंबातील ५ जण आहेत.

त्याची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच २ भाऊ यांचा यात सामावेश आहे. यातील इतर सदस्य जाकिर हुसेन रुग्णालयात तर एका भावास जिल्हा रुग्णालयातील कक्षात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. सुरेश जगदाळे यांनी दिली. जिल्ह्यातील २७ संशयितांचे घशातील स्राव तपासणीसाठी पुने येथे पाठवण्यात आले आहेत. यातील आज १३ प्राप्त झाले असुन सर्व निगेटिव्ह आहेत. तर उर्वरीत आज रात्री प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात सज्जता

करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विभाग सज्ज असून जिल्हा रुग्णालयात १०० खाटा, जाकिर हुसेन रुग्णालय ७० खाटा, मालेगाव शासकिय रुग्णालय २० व कळवण उपजिल्हा रुग्णालयात २० अशा २१० खाटांची व्यस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी व्हेंटिलेटर, पीपीई किट्स यासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *