Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी इथे क्लिक करा

Share
नाशिक | प्रतिनिधी 
विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी http://103.23.150.139/marathi/     या लिंकवर क्लिक करा.
याठिकाणी दोन पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. यामध्ये आपण विधानसभा निहाय आपले नाव शोधू शकतात. किंवा जिल्हा निवडणून विधानसभा मतदार संघ निवडणून आपले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकून एका कॅपिटा याठिकाणी टाकावा लागतो. तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे याठिकाणी दिसतील.
विशेष म्हणजे, याठिकाणी आपल्याला आपले मतदान कोणत्या बूथवर असेल हेदेखील दाखविण्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी मतदानाला जाताना तुमची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली आहे.

लक्षात ठेवा की, मागच्या वेळी इथे मतदान झाले असे समजून आपण जर नाव शोधायला गेलात तर बर्‍याच वेळा तिथे नाव शोधायला खुप उशीर लागू शकतो.

कधी-कधी मतदान केंद्र बदलले असू शकते. यामुळे नावाची तसेच मतदान केंद्राच्या माहितीची खात्री एकदा करून घ्यावी. तसेच जर आपल्यापर्यंत मतदानाच्या दिवसापर्यंत मतदानाच्या स्लीप पोहोचविणारे कर्मचारी तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर तुम्हाला ऑनलाईन नाव बघता येऊ शकते यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!