शाळेच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

0
कोतूळ (वार्ताहर) – शाळा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यालयातील 13 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण संचालकांकडे केली आहे.
बी.एस.बी.शिक्षण संस्था उल्हासनगर संचालित कोतूळ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात शिक्षण 13 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांनी चित्रकला ग्रेड परीक्षा दिली होती.
मात्र या विद्यार्थ्यांचे चित्रकला परीक्षेचे गुणदान दहावीच्या त्यांच्या निकाल पत्रात देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र संबंधित शिक्षक व पालकांनी मुख्याध्यापकांना 6 जून 2015 रोजी सादर केले होते. सदर प्रस्ताव एसएससी बोर्डाकडे पाठविला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना या परीक्षेचे गुणदान दिले नाही. त्यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संबंधित मुलांच्या पालकांनी केली आहे.
याबाबत मुख्याध्यापकांनी अरेरावी करून उडवाउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार पालकांनी केली आहे. तक्रारीचे निवेदन राज्याचे शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक पुणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणाधिकारी, अहमदनगर, अध्यक्ष बीएसबी शिक्षण संस्था, उल्हासनगर यांना पाठविले आहे. निवेदनावर सचिन गीते, बाळासाहेब चौधरी, युवराज घनकुटे, मारुती गोडे, तान्हाजी गोडे, भानुदास गोडे, नामदेव बर्वे, राहुल गोडे, विनायक बोर्‍हाडे, अण्णासाहेब वलवे, सुधीर लोखंडे या पालकांच्या सह्या आहेत.

  चित्रकला ग्रेड परीक्षेचे गुण दहावीच्या परीक्षेत धरण्याचा शासनाने या वर्षापासून निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय उशिरा झाला. यामुळे बहुतेक शाळांचे प्रस्ताव एसएससी बोर्डाकडे उशिरा गेले आहेत. शाळेकडून जाणीवपूर्वक उशीर झाल्याचा आरोप अयोग्य आहे. – लालू वाकचौरे, मुख्याध्यापक

LEAVE A REPLY

*