उद्यापासून फुलणार शाळा : सुटीची धम्माल संपणार…

0

गणोरे (वार्ताहर) – गुलाबांच्या फुलांनी नवागताचे स्वागत….नवीकोरी पुस्तके पहिल्याच दिवशी..शालेय पोषण आहारात गोडधोड जेवणांची शक्यता..रंगीत गणवेश…ऐसपैस गप्पाची संगत…बैठकाची रेलचेल…मान्यवरांची उपस्थिती..आणि अनेक दिवसांपासून स्थिरावलेली घंटा….आज पहिल्या दिवशीच घनघन वाजणार आहे..तर शिक्षकांच्या मोबाईलची रिंग मात्र या शैक्षणिक वर्षापासून थांबण्याची शक्यता आहे. सुमारे दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळांचे आवार चिमुकल्यांच्या सहवासाने पुन्हा फुलून येणार आहे.

गेली काही दिवस मुक्या झालेल्या शालेय भिंती उद्यापासून पुन्हा बोलू लागतील. शाळांचे आवार स्वच्छ दिसतील. त्यातच भर उन्हाळ्याच्या चटक्यांनी तापलेल्या शाळा मात्र आताच्या बरसणार्‍या पावसांनी काहीशा गारवा निर्माण करणार्‍या ठरत आहेत. यावर्षी इयत्ता सातवीचा आणि नववी चा अभ्यासक्रमात बदल झाल्याने नव्याने पाठयपुस्तके बाजारात आली आहे.
शासनामार्फत देणारी पाठ्यपुस्तके आता शाळाशाळांत पोहचली असून पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती पुस्तके मिळणार आहे.त्यामुळे कोरे करकरीत पुस्तकांचा गंधही मुलांना अऩुभवास मिळणार आहे. नवे लेखक..नवे कवी…नवा पाठ..नवा आशय…असे खूप काही मुलांना पहिल्या दिवशीच अनुभवास मिळणार आहे..त्यामुळे मुलांचा आऩंद व्दिगुणीत होईल तर पहिलीच्या वर्गात दाखल होणार्‍या मुलांचा स्वर मात्र काहीसा किरकिर करणाराच असेल.घर..कुंटूब…मित्र..परीसर सोडून ही मुले शाळेच्या औपचारीक प्रवाहात दाखल होणार असल्याने त्यांना काहीसा तणाव असल्याने एकीकडे पुस्तके नवे मिळाल्याने..मित्र पुन्हा भेटल्याने आनंद असणारा हा एक गट आणि दुसरा घरापासून दूर राहावे लागत असल्याने नाराज असलेला एक गट..अशा परीस्थितीत शाळांचे आजचे वातावरण काहीसे समिश्र स्वरूपाचे असणार आहे.
काय बदलणार…
या वर्षी शैक्षणिक वर्षांच्या आऱंभी शाळा सोडल्याचा दाखला,जनरल रजिस्टर नमुना यात बदल करण्यात येणार आहे. अनेक वर्षानंतर या दोन्ही महत्वाच्या कागदपत्रात बदल करण्यात येत आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि आय.डी नंबरचा समावेश करण्यात आलेला आहे. तर शाळासिध्दी व शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांची आर्थीक,सामाजीक,सांस्कृतीक माहितीसाठी जिल्हा परिषदेने प्रवेश प्रपत्रात बदल करीत याच शैक्षणिक वर्षापासून अमंलबजावणी सुरू केली आहे.
तासिकाही बदलणार- राज्य शासनाने या वर्षी कला कार्यानुभव शारीरिक शिक्षणांची तासिका कमी केल्या असून इतर विषयांच्या तासिकात वाढ करण्यात आली आहे. 35 मिनिटांची तासिका तीस मिनिटावर आणण्यात आल्या आहेत. परीपाठाची वेळ यापुढे कमी असणार आहे.त्यामुळे आदेशाप्रमाणे नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.

मोबाईल वापरण्यावर प्रतिबंध
राज्य शासनाने अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनाकरीता व्ह़ॉटसअप वापरण्याची अनुमती दिली आहे. मुळात मोबाईल वापरण्यावर प्रतिबंध आहेच. त्यात अहमदनगर जिल्हा परिषदेने देखील मोबाईल वापरणे बाबत प्रतिबंध करण्याचे धोरण नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतल्याने यापुढे शाळेत मोबाईलची रिंग वाजण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रीयेतील अडथळा कमी होणार आहे.

गणवेश पालकांच्या हाती…
या शैक्षणिक वर्षांपासून मुलींना देण्यात येणार्‍या दोन गणवेशाची रक्कम प्रत्येकी चारशे रूपये विद्यार्थी आणि आई यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मुख्याध्यापकांनी या गणवेश खरेदीची खात्री करून घ्यायची असून पावती जमा करणे मुख्याध्यापकांची जबाबदारी असणार आहे. या वर्षापासून नव्याने या स्वरूपात कार्यवाही सुरू होणार आहे.त्यामुळे अऩेक शाळा पहिल्याच दिवशी गणवेश घेत होती व वितरण करीत होती. मात्र यावर्षी गणवेश खरेदी पालकांच्या हाती असणार आहे.

LEAVE A REPLY

*