Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : आज शाळेचा पहिला दिवस : कुठे रडू, कुठे हसू

Share

नाशिक | प्रतिनिधी 

उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा एकदा शाळेची कवाडे उघडली आहेत. आज शाळेचा पहिला दिवस. अनेक ठिकाणी वेगवेळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

काही ठिकाणी बालवाडीत प्रवेश केलेल्या मुलांनी आपली आईलाही जवळ बसवले. काहींनी रडून-रडून शाळेचा वर्ग डोक्यावर घेतला. तर काहीजण शाळेत जायचं या हट्टाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होते त्यांनी मात्र तुफान आनंद लुटला.

शहरातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी आनंद दिसून आला. प्रत्येक शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे मनोभावे स्वागत केले. काही ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने बालवाडीत प्रवेश घेतलेल्या मुला-मुलीचे कुंकुमार्चन करण्यात आले.

कूमार्चन म्हणजे मुलाचे पाय कुंकुवाचे पाणी असलेल्या ताटात पाय बडवून शाळेत ठसे उमटवत प्रवेश करण्यात आला.  वेगवेगळया पद्धतीने झालेल्या स्वागतामुळे पालकवर्ग प्रसन्न झालेला दिसून येत होता.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!