Type to search

Breaking : पालघरमध्ये शाळेच्या बसला अपघात, 19 विद्यार्थी जखमी

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

Breaking : पालघरमध्ये शाळेच्या बसला अपघात, 19 विद्यार्थी जखमी

Share
पालघर : पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार विद्यार्थी आणि बसचालक गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

जे. पी. इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या अपगाघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी तर पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातात बसच्या काचेचा चक्काचूर झाला. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक बस सहा ऐवजी पाच चाकांवर धावल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या घटनेकडे शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला होता. आता याच शाळेच्या बसला अपघात झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!