शाळेत हजेरीसाठी ‘फेस रीडिंग प्रणाली’ विकसित

0

राळेगणसिद्धी जिल्हा परिषद शाळेत पहिला प्रयोग

पारनेर (प्रतिनिधी) – प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी स्मार्ट हजेरी अर्थात फेस रिडिंग प्रणालीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार त्याचा चा पहिला प्रयोग तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला. राज्यतंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड व विशाल दिवेकर यांनी विकसित केलेल्या फेस फाईव्ह या स्मार्ट अ‍ॅटेडन्स प्रणालीचा वापर केला गेला आहे. ही प्रणाली राज्यालाही दिशादर्शक ठरणार आहे.
राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांना स्मार्ट हजेरी सक्तीची करणार असल्याचे विधान नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार राळेगणसिद्धी येथे या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन पद्मभुषण डॉ. अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रणालीमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गात प्रवेश केल्यानंतर व फेस रीडिंग मशीन समोर उभे राहतात. पुढील एक सेकंदास संबंधित विद्यार्थी तसेच शिक्षकाच्या चेहर्‍याची खात्री होऊन ताबडतोब मुख्याध्यापक अधिकारी तसेच पालक यांच्या मोबाईलवर उपस्थिती माहिती जाते.
यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, रमेश औटी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांतिलाल मापारी, पारनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.जयश्री कार्ले, विस्तार अधिकारी सौ. शोभा मगर, केंद्रप्रमुख बाळकृष्ण खोसे, संजय पठाडे सर, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, विशाल दिवेकर मुख्याध्यापक राजाराम शितोळे, बाबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

शिक्षक, विद्यार्थी व पालक समन्वय वाढणार –
‘फेस रीडिंग प्रणाली’ या अनोख्या स्मार्ट तंत्राचा राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमल झाल्यास विद्यार्थी बोगस पटनोंदणी शाळाबाह्य मुलांची चुकीची माहिती देणार्‍या शाळांना आळा बसणार आहे. तसेच शाळेत वेळेवर उपस्थित न राहणार्‍या शिक्षकांनाही चांगलाच चाप बसणार आहे. स्मार्ट हजेरीबरोबर फेस फाईव्ह या प्रणालीच्या मदतीने शाळा व्यवस्थापनाच्या अनेक बाबी सोप्या झाल्या आहेत. यातील नोटीसबोर्ड या फिचर्सद्वारे शाळेतील महत्त्वाच्या सूचना पालकांच्या मोबाईलवर जातात. होमवर्क तसेच एक्झाम या फिचर्सद्वारे विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रगती व मूल्यांकनाबाबत पालकांना माहिती देणे सोपे झाले आहे. फेस फाईव्ह या अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने शाळा व पालक यांच्यातील अंतर कमी होऊन संवाद सोपा झाला आहे.

  जानेवारी महिन्यात दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव मा. अनिल स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली पाच राज्यांच्या शिक्षण सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नंदकुमार साहेबांमुळे मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. शिक्षक व विद्यार्थ्यांची स्मार्ट हजेरी हा या बैठकीचा प्रमुख विषय होता. यातूनच प्रेरणा घेऊन मित्र विशाल दिवेकर यांच्या मदतीने स्मार्ट अटेडन्ससाठी फेस फाईट ही स्मार्ट प्रणाली आम्ही विकसित केली आहे.  जानेवारी महिन्यात दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव मा. अनिल स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली पाच राज्यांच्या शिक्षण सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नंदकुमार साहेबांमुळे मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. शिक्षक व विद्यार्थ्यांची स्मार्ट हजेरी हा या बैठकीचा प्रमुख विषय होता. यातूनच प्रेरणा घेऊन मित्र विशाल दिवेकर यांच्या मदतीने स्मार्ट अटेडन्ससाठी फेस फाईट ही स्मार्ट प्रणाली आम्ही विकसित केली आहे. –  संदीप गुंड , राज्य तंत्रस्नेही शिक्षक

अशा प्रगत तंत्रज्ञानामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेतील विश्‍वासार्हता, गुणवत्ता व कार्यक्षमता वाढण्यात निश्चित मदत होईल. या उपक्रमाचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहे.
– पद्मभूषण अण्णा हजारे

LEAVE A REPLY

*