Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

15 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार शिष्यवृत्ती अर्ज

Share

नाशिक । प्रतिनिधी

सन 2019-20 साठी महाडीबीटी पोर्टलवरून शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

सन 2017-18 पासून महाराष्ट्र सरकारतर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी ही एकत्रित वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या पोर्टलवर विविध शिष्यवृत्तींसाठी ऑनलाइन अर्ज करता येतात. चालू शैक्षणिक वर्षासाठी ही अर्जप्रक्रिया सुरू असून 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्या वेतनेविषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पाठवलेल्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाची कॉलेजच्या लिपिक व प्राचार्यांच्या लॉगइनवरुन अचूक पडताळणी करून तातडीने पुढे पाठवावेत, तसेच कॉलेज स्तरावर अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे एकही शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित कॉलेजांचे प्राचार्य, विद्यापीठांचे कुलसचिव यांची राहील, याची नोंद घ्यावी, असे उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!