Thursday, May 2, 2024
Homeनगरसायखिंडी फाटा येथे 48 हजाराचा गुटखा जप्त

सायखिंडी फाटा येथे 48 हजाराचा गुटखा जप्त

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

मानवी आरोग्यास हानीकारक असल्याची जाणीव असतांनाही विक्री करण्याच्या उद्देशाने गुटख्याची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

त्यांच्याकडून 47 हजार 700 रुपयांचा गुटखा व साडेपाच लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे.

संगमनेर तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री सुरु आहे. तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी लोगन कंपनीची कार क्रमांक एम. एच. 04 ई. डी. 7283 आढळली.

पोलिसांनी चौकशी केली असता या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गटखा दिसून आला. पोलिसांनी पंचनामा करुन 38 हजार 160 रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे 318 पॅकेट, 9 हजार 540 रुपये किंमतीची रॉयल 717 तंबाखुचे 318 पॅकेट व साडेपाच लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे.

याबाबत पोलीस शिपाई सचिन धनवटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अफ्रोज रफिक शेख (वय 26), कैफ अन्वरखान पठान (वय 26) दोघेही रा. नायकवाडपुरा, रितेश सुभाषचद्र गादीया (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 98/2021 नुसार भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59, 26, (2), (4) प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन हे करत आहे.

राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतांनाही संगमनेर शहर व तालुक्यात मात्र दररोज लाखो रुपयांच्या गुटख्यांची विक्री होत आहे. काही गुटखा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुटख्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा करुन ठेवलेला आहे.

तालुक्यातील एका गावात नवीन गुटखाकिंग उदयास आल्याची चर्चा असून तो शहरामध्ये गुटख्याचा पुरवठा करत असल्याचे बोलले जाते. पोलिसांनी गुटखा विक्रीची पालेमुळे खोदून संबंधीतावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या