Tuesday, April 23, 2024
Homeधुळे650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध

650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध

धुळे – 

650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून आज या गटांना धानदेशाचे वाटप महापालिकेतर्फे करण्यात आले. धनादेश वाटपप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत दारिद्य्र रेषेखाली महिलांचा बचत गट तयार करण्यात येतो. बचत गट स्थापन झाल्यानंतर त्या गटाला तीन महिने पुर्ण झाल्यानंतर गटाची प्रतवारी करुन त्या गटांना प्रतिगट दहा हजार रुपये देण्यात येते.

2018-19 या वर्षात आतापर्यंत 25 गटांना फिरता निधी वितरीत करण्यात आला असून आता 96 बचत गटांना प्रती गट दहा हजार रुपये या प्रमाणे नऊ लाख 60 हजार फिरता निधी वाटप करण्यात येत आहे. हा फिरता निधी उपलब्ध झाल्यामुळे बचत गटातील महिलांचा अंतर्गत व्यवहाराला गती मिळेल व महिलांच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिपीका अभियानांतर्गत सहा वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात आले आहे. या प्रति वस्तीस्तर संघाला 50 हजार रुपयांप्रमाणे तीन लाख फिरता निधी वितरीत करण्यात येत आहे.

एका वस्तीस्तर संघात दहा बचतगटांचा समावेश म्हणजे शंभर महिला एका वस्तीस्तर संघात आहेत. एनयुएलएम अंतर्गत आतापर्यंत 700 महिला बचतगट स्थापन करण्यात आले असून त्यापैकी 650 बचतगटांना फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, निशा पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक अधिकारी हेमंत मदाने, नगरसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या