सावेडीतील जुगार क्लबवर रेड

0

नगर टाइम्स,

18 अटकेत, सहा लाख हस्तगत

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरात सुरू असणार्‍या जुगार अड्ड्यावर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल सहा लाखा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांनी जागाचा मालकसह 18 जुगार्‍यांना रंगेहात पकडत रोकडसह सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

सागर प्रकाश गर्जे (रा.गुलमाहेर रोड) अंबादास सुदर्शन चैन्नुर (दातरंगे मळ), ज्ञानेश्‍वर मच्छिंद्र दौंडकर (तोफखाना), स्वप्निल राजेंद्र दातरंगे (दातरंगे मळा), विकास मायकल शिंदे (डॉनबासको कॉलनी), रविंद्र सुरेश बारस्कर (झारेकर गल्ली), विशाल क्रांतीलाल गांधी (माळीवाडा), सागर हिरालाल कासवा (पटवर्धन चौक), नंदकिशोर गेंडालाल बिंद्रे (मोचीगल्ली), सचिन दिलीप सुरसे (नालेगांव), सुरज दिपक तोरटकर (शिवाजीनगर), शहानवाय लियाकत शेख (मुकूंदनगर), संतोष लक्ष्मण होनराव (डावरे गल्ली), कुणाल आसाराम कुराने (मुकूंदनगर), हेमंत कुंडलिक गिरवले(गोविंदपूरा), चैतन्य जाधव (जागा मालक) अशी जुगार्‍यांची नावे आहे.

सावेडीतील हुंडेकरी लॉनच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांना खबर्‍यामार्फत मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सफौ. मंडलिक, हेकॉ.घोरपडे, गिरवले, चव्हाण, सलीम शेख, बारवकर, शेख, गाडळीळकर, सुपारे, अभिजित अरकल यांच्या पथकाला त्यांनी छाप्याचे आदेश दिले. या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरील 18 जणांना रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून जुगार्‍याचे साहित्य, रोकड असा 6 लाख 3 हजार 40 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*