Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सावेडीच्या कचरा डेपोच्या जागी स्मशानभूमी

Share

नगरसेवक संपत बारस्कर यांची माहिती : प्रस्ताव महापौरांकडे

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीचा कचरा डेपो इतरत्र स्थलांतर होणार असून त्याजागी स्मशानभूमी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव महापौर कार्यालयाकडे दिला असल्याची माहिती नगरसेवक संपत बारस्कर यांनी दिली. यामुळे सावेडीकरांचा स्मशानभूमीचा महत्वाचा विषय मार्गी लागणार आहे. प्रभागातील विविध विकास कामांचा प्रारंभ भिस्तबाग चौकात रविवारी झाली. यावेळी नगरसेवक बारस्कर बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, मोहन मानधना, शीतल जगताप, मीनाताई चव्हाण, दीपाली बारस्कर, निखील वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे, उदय कराळे, गणेश भोसले, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब बारस्कर, नितीन बारसकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

महापालिकेची निवडणूक लढतेवेळीच कचरा डेपो हलविण्याचे आश्‍वासन वार्डातील जनतेला दिले होते. स्थायी समितीने नव्या कचरा डेपोला मान्यता दिल्याने सावेडीतील डेपो तिकडे स्थलांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवर स्मशानभूमी करण्यासाठीचा प्रस्ताव महापौर कार्यालयाकडे दिला असून वार्डातील विकास कामांसाठी महापौर निधीसह इतरही नगरसेवकांनी निधी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक गणेश भोसले यांनी माजी आमदार अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ‘बंद पडणारी गाडी नको, तर स्पीडने धावणारी गाडी हवी’ असे म्हणत त्यांनी राठोड यांच्यावर टीका केली.

आमदार जगताप यांनी नगरची बदनामी करणार्‍यांच्या सुरात सूर न मिळवता त्यांचा प्रतिकार करा. 25 वर्षात न झालेली विकास कामे पाच वर्षात करून दाखविली. कामे न करणार्‍यांकडे कारणांची यादी तयार असते, मात्र माझ्याकडे कामांची यादी तयार असल्याचे सांगत विकासाच्या मुद्द्यावरच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले.

सर्व वक्त्यांचा रोख राठोडांवर
कार्यक्रमात ज्या ज्या वक्त्यांनी टीकात्मक भाषण केले त्यांचा सगळा रोख शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याकडे होता. वयोवृध्दापेक्षा तरुण चेहरा विकास कामे करील. 25 वर्षात काय विकास केला, सूडबुध्दीचे राजकारण करणार्‍यांना थारा नको, यासह अनेक मुद्द्यांना हात घालत वक्त्यांनी राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीका केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!