सावाना फेरमोजणी; बीजी वाघ तीन मतांनी विजयी

0
नाशिक | सावाना फेरमोजणीत बीजी वाघ तीन मतांनी विजयी झाले आहेत.

बी जी वाघ यांना 897 तर बेळे यांना 894 मते मिळाली. एकूण 8 फेऱ्या, 9 कर्मचारी, 4 टेबल वर ही प्रक्रिया पार पडली.

या पूर्वी वाघ यांची दोन मते हंसराज वडघुले यांना मोजली गेली होती.

‘हा निवडणूक प्रकियेचा भाग असून सावानाशी जुने संबंध आहेत. निवडून आलो म्हणून हुरळून जायचे काम नाही, विजयाकडे मी तटस्थपणे पाहतो,’ अशी प्रतिक्रिया बी जी वाघ यांनी दिली.

सावानाच्या फेर मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला. बी जी वाघ यांनी अर्ज केल्याने ही मतमोजणी होत आहे. मात्र न्यायालयात गेलेले धनंजय बेळे यांनी सुरेश गायधनी यांच्या हस्ते पाठवले पत्र  पाठवून विरोध दर्शविला होता.

एकूण 1995 मतपत्रिका असून त्यातील 111 बाद त्यामुळे 1884 पत्रिकांची  मतमोजणी होत आहे. बी जी वाघ यांच्या वतीने हेमंत देवरे, अमोल बर्वे उपस्थित आहेत,  तर यांच्या वतीने कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते

 दरम्यान सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना फेर मतमोजणीचा अधिकार नसल्याने त्यांना फेर मतमोजणी करण्यास मनाई करावी अशा आशयाचा अर्ज धनंजय बेळे यांनी न्यायालयात केला होता. तो अर्जा तिसरे दिवाणी सह न्यायाधिश एस.एस.सस्ते यांनी आज फेटाळला. त्यामुळे मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा मतमोजणी सुरु झाली

या निकालामुळे धनंजय बेळे आणि भालचंद्र वाघ यांच्यातील मतांची फेर मतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला होता  सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची सन 2017 ते 2022 या कार्यकाळाची पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी दि. 3 एप्रिलला झाली होती.

यावेळी 15 व्या क्रमांकाचे मते मिळालेले धनंजय बेळे आणि 16 व्या क्रमांकाची मते मिळालेले भालचंद्र वाघ यांच्या मतांमध्ये केवळ 1 मताचा फरक आल्यानेे भालचंद्र वाघ यांनी फेर मतमोजणी घ्यावी असा अर्ज दि. 3 एप्रिल 2017 रोजी रात्री निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याकडे दिला होता.

या अर्जानुसार दि. 7 एप्रिल रोजी फेर मतमोजणी घेण्यात येणाार होती. परंतु त्यावेळी बेळे यांनी विनंती केल्यामुळे 1 महिना फेर मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान बेळे यांनी फेरमतमोजणीला आव्हान देणारा अर्ज सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे दाखल केला होता.

फेर मतमोजणी हा निवडणूक प्रक्रियाचाच एक भाग असल्याने आणि मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम कलम 41 अ, अन्वये निवडणूक विषयक निर्देश देण्याची तरतुद नसल्याने सहाय्यक धर्मादय आयुक्त पंडित यांनी दि.12 ऑक्टोरला सदर अर्ज फेटाळून लावला . या पार्श्वभूमीवर दि. 31 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वा. फेर मतमोजणी सुरु करण्यात आली होती. दरम्यान बेळे यांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावनी सुरु असतांना दुपारी न्यायालयाचे निर्देशानुसार फेर मतमोजणीचे काम थांबविण्यात आले.

दरम्यान या दाव्याची सुनावनी होऊन वरील प्रमाणे निकाल लागला आहे. त्यमुळे आता पुन्हा मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान 2 नोव्हेंबरला झालेल्या सुनावनीत बेळे यांच्यावतीने अ‍ॅड.विनयराज तळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यावतीने अ‍ॅड.विलास लोणारी, भालचंद्र वाघ यांच्यावतीने अ‍ॅड.दौलतराव घुमरे आणि अध्यक्ष, सावाना यांच्यावतीने अ‍ॅड.अतुल गर्गे यांनी युक्तीवाद केला.

त्यावेळी अ‍ॅड.विनयराज तळेकर यांनी युक्तीवादात सांगितले की, सदर प्रकरणात नजरचुकीने निवडणूक अर्ज असे संबोधण्यात आले असून तो नियमित दावा समजून नोंदविण्यात यावा. यासंबंधीत दोन्ही बाबीेंची चौकशी होऊन सदर निवडणूक अर्ज दिवाणी दावा होऊ शकत नाही आणि निवडणूकी संबंधी निवडणूक अर्जात केलेल्या मागण्या निवडणूक प्रक्रिया संपलेली नसल्यामुळे फेर मतमोजणी स्थगित करण्याचा अर्ज कायदेशीर होऊ शकत नसल्याने तो अर्ज फेटाळण्यात आल्याचा निर्णय दिवणी सह न्यायाधिश एस.एस.सस्ते यांनी दिला .

LEAVE A REPLY

*