Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सातपूर पोटनिवडणुकीसाठीं दोन अर्ज; बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न

Share

नाशिक । प्रतिनिधी 

सातपूरच्या प्रभाग 10 साठीच्या पोटनिवडणूक भाजप -शिवसेना युतीचे उमेदवार इंदूबाई नागरे यांच्यासह अपक्ष उमेदवार दत्तू वामन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने बिनविरोधबद्दल शंकाउपस्थित केली जात आहे. प्रत्यक्षात छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले.

मनपाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी द्यावी, यावर चर्चा रंगलेली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींनीदेखील बैठक घेऊन मुलाखती घेतल्या होत्या.

पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भाजप प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी सहानुभूती लक्षात घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्याची विनंती माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.

सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याने छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतून माघार घेत सहानुभूतीपूर्वक बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सदस्य दत्तू वामन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यामुळे काही काळ प्रश्न गंभीर झाला आहे. या अर्जांबाबत उद्या छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी साकडे घालण्यात आले. या शिष्टमंडळाने यावेळी भाजप उमेदवाराला सर्व पक्षांचा पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीनेही सहानुभूतीपूर्वक विचार करून पाठिंबा देण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात शशी जाधव, गणेश बोलकर, विक्रम नागरे हे होते. त्यांनी लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क करून दिले. यावेळी राकाँचे गजानन शेलार, नाना महाले, नितीन निगळ, बाळासाहेब जाधव, अरुण पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


राजेंद्र नागरेंची चिडचिड

शिवसेनेचे उमेदवार गोकूळ नागरे यांचे बंधू राजेंद्र नागर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात 3 वाजून 20 मिनीटांनी प्रवेश करीत मला आत येऊ न दिल्याची तक्रार केली व अर्ज घेण्याचा आग्रह धरला.

त्यांच्या म्हणण्यानुसार आपण उमेदवारी अर्जासह मनपा कार्यालयात अडीच वाजता प्रवेश केला होता. मात्र, कक्षाचा दरवाजा बंद झाला असल्याची तक्रार करून नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांना कक्षाचे दरवाजे तीन वाजता बंद करण्यात आले असल्याचे सांगून अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. अखेर वादात पोलिसांना पाचारण करून त्यांना बाहेर काढण्यात आले.


 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!