Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लाच प्रकरणी चिखलीकर, वाघ यांची निर्दोष मुक्तता

Share

नाशिक । प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांच्या राज्यभर गाजलेल्या प्रकरणात आज निर्दोष मुक्तता झाली आहे. चिखलीकर यांनी लाच मागितली हे सरकारी पक्षकार सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

दरम्यान, जर सरकारी पक्षास वरिष्ठ न्यायालयात जावयाचे असल्यास १५ हजाराच्या जातमुचलक्यावर तात्पुरत्या स्वरुपात चिखलीकर व वाघ यांना जामीन मंजूर करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागात काम केल्यानंतर ठेकेदाराचे 3 लाख 69 हजार रुपयांचे बिल मंजुर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 एप्रिल 2013 रोजी सापळा रचून लाचप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागाने तपास करून सुमारे 2 हजार पानी दोषारोपपत्र न्यायलयात दाखल केले होते. दरम्यान, आज न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. यामध्ये लाच मागितले हे सरकारी पक्षकाराकडून सिद्ध करण्यात अपयश आले. प्रत्यक्ष लाच हातात घेतली नसल्याचे स्पष्ट झाले.

तसेच, १६ हजार पेक्षा अधिक पेस्केल असलेल्या कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करावयाचा असल्यास मुख्यमंत्री व सचिवांची मजुरी घेणे आवश्यक असते.   मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेताच सचिवांकडून परवानगी घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

निर्दोष मुक्तता करण्यात आली असतानाही जर सरकारी पक्षाला वरिष्ठ न्यायालयात जावयाचे असेल तर तात्पुरत्या स्वरुपात १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!