Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

अन् ‘त्या’ प्रश्नांवर उदयनराजेंना रडू कोसळलं…

Share

मुंबई : हातावरील घड्याळ काढून ठेवत कमळ हातावर फुलवणारे उदयनराजे भोसले यांना आज एका प्रश्नांवर रडू कोसळल्याचे दिसून आले. दरम्यान पत्रकारांशी ते बोलताना म्हणाले कि शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करीत असतील तर मी फॉर्म भरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकाराने प्रश्न शरद पवार यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला , मात्र त्या ते भावनिक होत त्यांना रडू कोसळलं. तसेच शरद पवार हे साताऱ्यातून उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही असे सूचक विधान यावेळी उदयन राजेंनी केले. तसेच शरद पवार हा माझ्यासाठी सदैव आदरणीय राहतील याबद्दल तिळमात्र शंका नाही.

येत्या २४ ऑक्टोबरला सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान ही निवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!