सातारा : कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला

0

साताऱ्यातील कास पठाराकडे जाणारा रस्ता सोमवारी खचल्याने पठाराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा पुष्प हंगाम सध्या ऐन बहरात आहे. या काळात कास पठारावर विविध प्रकारची फुले उगवतात. त्यामुळे या काळात मुंबई, पुण्यासह देशभरातून अनेक पर्यटक कास पठारावर येतात.

हा हंगाम काही दिवसांपुरताच मर्यादित असल्याने सध्या येथे प्रचंड गर्दीही होताना दिसत आहे. मात्र, आज सकाळी कास पठाराकडे जाणारा यवतेश्वरच्या घाटातील रस्ता अचानकपणे खचला.

परिणामी कास पठाराकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

LEAVE A REPLY

*