Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सातारा पोटनिवडणूकही २१ ऑक्टोबरलाच; राजेंना दिलासा

Share

सातारा : अखेर उदयन राजेंना दिलासा मिळाला असून येत्या २४ ऑक्टोबरला सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान ही निवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक (दि. २१) रोजी जाहीर करण्यात आले होते . त्यावेळी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र आज (दि. २४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केले.

दि. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या मतदानावेळीच लोकसभेच्या पोटनिवडणूकीचेही मतदान होणार आहे. तसेच २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

  • अधिसूचना- २७ सप्टेंबर
  • नामनिर्देशनाची अंतिम तारीख -४ ऑक्टोबर
  • छाननी- ५ ऑक्टोबर
  • माघार- ७ ऑक्टोबर
  • मतदान- २१ ऑक्टोबर
  • मतमोजणी- २४ ऑक्टोबर
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!