Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आरम नदीच्या पुरातून युवकास वाचवले

Share

सटाणा : केळझर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातून विसर्ग करण्यात आल्याने आरम नदीला या हंगामातील पूर आला आहे. दरम्यान या नदीवरील बंधाऱ्यावर खमताणे येथील तरुण अडकला असून त्याला मदत करण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान आरम नदीला पूर आल्याने खमताणे येथील तरुण रस्ता पार करीत असतांना या ठिकाणी अडकला. तब्बल दोन तासापासून हा तरुण अडकला असून त्याची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

घटनास्थळावर सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व खमताणे गावातील नागरीक असून पूर वाढल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. यामुळे पूर असतानाही बचावकार्य चालू असून पूर ओसरला तर मदतकार्यात गती मिळणार आहे.

वारंवार सुचना देऊनही नागरीक अशा प्रकारे जीव धोक्यात घालत असल्यामुळे प्रशासनाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!