Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
तालुक्यातील देवळे येथील विवाहीता मोहिनी सुनिल तोकडे हीने सासरच्या त्रासाला कंटाळून (दि. १२) रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली.

याबाबत घोटी पोलीस ठाण्यात पती, दीर व जाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही आत्महत्या नसुन माझ्या मुलीची हत्या केल्याचा संशय असुन आरोपी विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद बोरटेंभे येथील मुलीचे वडील सुभाष बाबुराव आतकरी यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे.

इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील मोहीनी हीचे देवळे येथील सुनिल तोकडे याच्या बरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तीला मुलबाळ लवकर न झाल्याने सासरी नवरा, सासु, दीर व जाव यांनी वारवांर तीला त्रास देण्याबरॊबर, घरात दुय्यम वागणुक देत तसेच मारझोड करणे, यासह तिच्याकडे सासरच्या लोकांनी वारंवार माहेरकडून पैसे आण अशी मागणी करुन अनेकदा तीला मारले. माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसुन तीची हत्या केलेली असल्याचे मुलीचे वडील सुभाष बाबुराव आतकरी राहणार बोरटेंभे यांनी पोलीस फिर्यादित म्हटले आहे.

घरात आत्महत्येची घटना घडलेली असतांना मयताचा पती लपुन बसला व सासरच्या मंडळीनी पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात मृतदेहाचा गळफास काढुन खाली उतरवला हा प्रकार पोलिसांसमोर झाला नाही. मात्र मुलीचे वडील व नातेवाईक जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा संशयास्पद वातावरण दिसुन आले.

या घटनेत संशयीत आरोपी मयतेचा पती सुनिल तोकडे, दिर भरत तोकडे, जाव मनिषा भरत तोकडे या तिघांना घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन मयताचा चुलत सासरा रघुनाथ तोकडे यांच्यावरही घोटी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!