Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जनतेला आता अडाणी आमदार नको : ससाणे

Share

मी श्रीरामपूरचाच रहिवासी : लहु कानडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्याचे प्रश्न मागील 10 वर्षांपासून गंभीर स्वरूपाचे झाले आहेत. आपण श्रीरामपूरकरांनी ज्यांना निवडून दिले, त्यांना यंत्रणाच माहित नसल्याने तालुक्याचा विकासच करता आला नाही. त्यांचा प्रशासनाचा अभ्यासच नाही. म्हणूनच आता अशा अडाणी आमदाराला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असे प्रतिपादन करण ससाणे यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार लहु कानडे उच्चशिक्षित असून त्यांना शासकीय पातळीवरून कामे खेचून आणण्याचा अनुभव आहे. आणि अशाच कौशल्यपूर्ण व अभ्यासू नेतृत्वाची नितांत आवश्यकता श्रीरामपूरच्या जनतेला आहे व ती तुम्हीच मिळवून देणार असेही श्री. ससाणे म्हणाले. चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करजगाव, जातप, भेर्डापूर या गावांतील प्रचार बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी जी. के. बकाल, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले, राष्ट्रवादीचे कैलास बोर्डे, सुभाष राजुळे, पंडितराव बोंबले, दीपक पवार, मदन हाडके, आबा पवार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे उमेदवार लहु कानडे म्हणाले, माझ्या विरोधात जे लोकप्रतिनिधी आरोप करतात की, मी श्रीरामपूरचा नाही, परंतु त्यांना माहिती नसेल कि, माझे घरच श्रीरामपूरमध्ये आहे. मी स्वतःला श्रीरामपूरचा एक घटकच समजतो आहे. मला तालुक्यासाठी काम करायचे आहे. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन तळागाळातील जनतेला विकासाच्या प्रक्रियेत आणायचे आहे. परंतु विरोधी लोक प्रतिनिधीकडे विकासाचा मुद्दाच नाही, म्हणूनच ते चुकीचे आरोप करून श्रीरामपूरच्या जनतेला फसवण्याचेच काम करत आहेत. परंतु श्रीरामपूरची जनता हुशार आहे, ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

सचिन गुजर म्हणाले की, स्व. गोविंदराव आदिक व स्व. जयंतराव ससाणे यांनी या तालुक्याची विकासाची घोडदौड चालू ठेवली होती. परंतु गेल्या 10 वर्षांपासून तालुक्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. लोकप्रतिनिधीला जनतेचे प्रश्नच कळत नाहीत. म्हणून आता आपण सर्वांनी ठरवले आहे की, उच्च शिक्षित प्रशासनाचा अभ्यास असणारे, वेळ प्रसंगी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा, जनतेच्या सुख दु:खात सहभागी होणारा व जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासकीय पातळीवर आक्रमक भूमिका घेणारा आमदार आपल्याला येत्या 21 तारखेला निवडून द्यायचा आहे. त्यासाठी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!