अहमदनगर : आयपीएस मनिष कलवाणीया नगर ग्रामीणचे नवे डिवायएसपी

0

अहमदनगर : पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांची साई सुरक्षा विभाग येथे बदली आहे. त्यांच्या जागी मनिष कलवाणीया (आयपीएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सायंकाळी नगर ग्रामीण विभागीय कार्यलयाचा पदभार स्विकारला आहे.

कलवाणीया हे मुळत: राजस्थानचे आहेत. सन 2015 सालच्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. हैद्राबाद येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी जळगाव येथील भुसावळ येथे प्रशिक्षणार्थीचा कालावधी पुर्ण केला आहे. तेथील यशस्वी कार्यकीर्दीनंतर त्यांची नियुक्ती नगरच्या गामीण विभागात झाली आहे. त्यांच्या अंतर्गत एमआयडीसी, सुपा, पारनेर, नगर तालुका या पोलीस ठाण्यांचा सामावेश आहे. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी काम करू अशी प्रतिक्रीया कलवाणीया यांनी दिली.

दरम्यान पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी साई सुरक्षा मंदीराच्या सुरक्षेबाबतचा पदभार स्विकारला आहे. नगरला हजर झालेल्या सर्व डिवायएसपी यांच्या तुलनेत भोईटे यांनी कोणताही ठकपा न घेता. यशस्वी कार्यर्कीर्द पार पाडली आहे. त्यांनी 40 पेक्षा जास्त आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहेत. पांगरमल दांरुकांड, संदिप वराळ व दरोडे अशा अनेक घटनांचा तपास करुन 80 पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

भोईटे यांनी स्वत: साई सुरक्षेसाठी नियुक्तीची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

*