Photogallery: बळीराजाला विखेंमुळे बळ!

0

208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब दत्तक;  सरकारने जबाबदारी घ्यावी : ना. विखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याचे सरकार मेट्रो सोडून दुसरा कोणताच विचार करतांना दिसत नाही. सत्ता भोगणार्‍यांनी जबाबदारी स्वीकारावी. टीका न करता दायीत्व स्वीकारल्यास आत्महत्या थांबतील. शेतकर्‍यांच्या आत्महत्या पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यासाठी कायम स्वरूपी एकत्र येवून मार्ग काढण्याची गरज आहे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक शांतीलाल मुथ्था हे होते. यावेळी 208 आत्महात्या ग्रस्त कुटूंबांना धनादेश वाटप, 50 कुटूंबीयांना बी-बियांनाचे वाटप व पारगंमल घटनेतील 9 मयत कुटूंबांच्या वारासांना आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तिविक डॉ. सुजय विखे यांनी केले. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी. खासदार दादा पाटील शेळके, माजी. आ. नंदकुमार झावरे, जयंत ससाणे, विनायक देशमुख, अण्णासाहेब म्हस्के, ऍड.सुभाष पाटील, धनश्री विखे, सीओ. रविंद्र बिनवडे, महिला बालकल्याण समितीचे अनुराधा नागवडे, उमेश परहर, जि.प. सदस्य प्रताप शेळके, शिवाजी गाडे, राजेश परजणे, बाळासाहेब गिरणकर, दत्ता वारे, अभिषेक कळमकर, रावासाहेब तनपुरे, आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

विखे मुख्यमंत्री असते तर..
मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे. यावर ठोस अशा उपयाची गरज निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे. खासदार बाळासाहेब विखे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. मात्र विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असते तर हा कार्यक्रम घेण्याची वेळ आली नसती, असे सुजय विखे म्हणाले.

अन् अश्रू अनावर…
पांगरमल येथील दारू कांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना विखे कुटुंबीयींच्या वतीने मदत देण्यात आली. यावेळी 50 अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम देण्यात आली. मदत मिळाल्यानंतर शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. सर्वच उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

डॉ. सुजय यांनी राज्यात नेतृत्व करावे : डॉ. कदम
शेतकरी आत्महात्या ग्रस्त कुटूंबांना मदत करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. लोकांच्या दुःखात सहभागी होऊन वाढदिवस साजरा केला. यांचा राज्यातील इतर राजकीय पुढारी निश्‍चित आदर्श घेतील. सुजय विखे यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मुलींनी यावेळी मनोगत व्यक्त करून आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली. विखे यांच्या या उपक्रमांचे कौतुक केले.

मध्यावधीला तयार
सध्याचे भाजप सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर गंभीर नाही. ते मध्यावधी निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष विचलित करत आहे. ते जर मध्यावर्ती निवडणूकीला तयार असेल तर आम्ही केव्हाही या निवडणूकीला तयार आहोत. तत्काळ कर्ज माफीचा आदेश काढून तत्वतः चा खेळ बंद करावा. असे आवाहन ना. विखे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*