सार्वमत शॉपिंग एक्स्पोला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

jalgaon-digital
5 Min Read

पतसंस्था, शैक्षणिक संस्था, लहान मुलांची खेळणी, गृहपयोगीपासून ट्रॅक्टर आणि कारसह सर्व स्टॉलवर खरेदीसाठी झुंबड

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – दै. सार्वमत आयोजित ‘सार्वमत शॉपिंग महोत्सव 2020’ ला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी ग्राहकांनी खरेदीबरोबरच वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची चव चाखली. त्यातच या जोडीला मनोरंजनाचा खजिनाही ग्राहकांनी लुटला.
येथील थत्ते मैदनावर चार दिवस हा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे प्रायोजक समता नागरी सहकारी पतसंस्था असून सहप्रायोजक महर्षी नागरी सहकारी पतसंस्था, चंदूकाका ज्वेलर्स, साई आदर्श मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी आणी डी.एम. मुळे चष्मावाला हे आहेत.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये नागेबाबा मल्टीस्टेट, साई निर्माण उद्योगसुमह, श्री साई टायर्स अ‍ॅण्ड ट्रक्टर्स, शिरोडे ह्युंडाई, योगिराज फर्निचर, पिपाडा मोटर्स, किसान कार्पोरेशन, भनसाळी टिव्हीएस, पॉपकॉर्न मेकर, ज्युसर, नागली फिंगर्स, रोहित मार्केटिंग, अविनाश सेल्स टॉवर फॅन, डि. एम. मुळे चष्मावाला, संस्कार मासले, मोहमंद किचन वेअर, विर फिटनेस, मुस्ताक किचनवेअर, गॅस जाळी, प्रिंन्स पेस्ट कंट्रोल, हरे रामा, हरे कृष्णा, अन्सारी टीव्ही कव्हर्स, राजू स्टोन ज्वेलरी, अम्बीकॉन ऑईल मशिन, दासणी लेडीज फूटवेअर, अली कार्पेट, पारस पापड, धरतीमाता नॉव्हेल्टी स्टोअर्स, द्वारकेश फार्मा, एस. ए, ग्रुप रोटी मेकर, गुजराथी नमकीन, गौरव मार्केटिंग, प्रथमेश मार्केटिंग, तिरुपती सेल्स, किरण बेकर्स, वरद हर्बल, रामेश्‍वर इंडस्ट्रीज, खादी शर्ट, कॉटन सॉक्स आदी व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

सार्वमत शॉपिंग महोत्सवामध्ये ग्राहकांना खरेदीसाठी गॅस स्टोह, फिटनेस साहित्य, पेस्ट कंट्रोल, नागली फिंगर्स, पॉपकॉर्न मेकर, फर्निचर, पिकनिक टेबल, हॉट बॅग, शिलाई मशिन, चप्पल, बुट, नमकीन, विविध प्रकारचे साबण, रोटी मेकर, खादी शर्ट, कॉटन शॉक्स, विविध प्रकारचे औषधे, टु-व्हिलर, फोर व्हिलर, गॅस जाळी, विविध प्रकारचे मसाले, किचन वेअर, हळदी प्रॉडट्क्स्, प्लॉट व फ्लॅट, चिक्की व गुळपट्टी, हर्बल, ट्रॅक्टर, जवस, हिंगोळी, मॅजिक बुक, मणुके, लेग मसाजर्स, ऑईल मेकिंग मशिन, नोट कांऊटींग मशीन, ग्लास क्लिनर, धुप स्टँड, नागली पापड, फॅन्स, खुर्च्या, खाकरा, सोयास्टिक, उडीद पापड, कुर्डई, चुर्णमुखवास, बल्ब, सेव्हर, भेंडी कटर, स्लाईसर, ज्युसर, आयमास्क, आयुवेर्दीक औषधे, मिल्क शेक पावडर, कॉटन सारीज, खानदेशी उडीद पापड, हेअर ड्रायर, वेदनाशामक ऑईल, गुलाबजल, जडीबुडी, कॉस्मेटीक्स, आटामेकर, हँगिग झुला आदी वस्तूबरोबरच भरीत भाकरी, पुरणपोळी मांडे, फ्रुट चाट, शेगाव कचोरी, दिल्ली पापड, मसाला पान, वडापाव, दाबेली, धपाटे, पाणीपुरी यासह विविध प्रकारचे खाद्यप्रदार्थ ग्राहकांना याठिकाणी उपलब्ध आहेत.

धपाटा स्टॉलचा झपाटा
अनेक प्रदर्शनामध्ये लोकप्रिय ठरलेेला श्रीरामपुरातील शिवाजी गोडसे यांचा धपाटा श्रीरामपूरकरांना चांगलाच भावला आहे. . धपाट्या बरोबरच खमंग आळुची पानवडी, शेवंती तसेच इडली सांबरची चवही श्रीरामपूकरांनी चाखली. धपाट्याच्या तिखट चवीनंतर श्रीरामपूरकरांनी अनारसेचीही गोडी चाखली. या स्टॉलवरही मोठी गर्दी झाली होती.

कुरकुरीत नागपूर मसाला पापड
कुरकुरीत आणि खमंंग नागपूर मसाला पापड खाण्यासाठी श्रीरामपुरातील खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. कुरकुरीत पापडाबरोबरच या स्टॉलवर दाबेलीची चवही ग्राहकांनी चाखली. चटकदार नागपूर मसाला पापड, दाबेली ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने या स्टॉलवर मोठी गर्दी झाली. आणखी तीन दिवस श्रीरामपूरकरांना चटकदार दाबेली व कुरकुरीत पापड आकर्षित करणार आहे.

मांड्याची चवच न्यारी
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, शिरुर येथील दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या मांड्याची चव श्रीरामपुरकरांनी चाखली. मांडे घेण्यासाठी त्यांच्या स्टॉलवर नागरिकांनी गर्दी केली होती. मांड्याबरोबरच खानदेशी दाळ-भात तसेच त्यांचे इतर पदार्थ देखील श्रीरामपूरकरांच्या पसंतीला उतरले. त्यामुळे आणखी तीन दिवस मांड्याची चव घेण्यासाठी श्रीरामपूरकर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार हे नक्की…!

शेगावची खमंग कचोरी
शेगावच्या खमंग, चविष्ट कचोरीची चव चाखण्यासाठी श्रीरामपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. कचोरीबरोबरच सोबतीला चटणीही असल्याने शेगाव कचोरीची चव न्यारीच असल्याचे बोल श्रीरामपूरकरांनी बोलून दाखविले. 1960 पासून वडिलोपार्जीत असणारा हा व्यवसाय त्यांच्या पुढील पिढेनेही सुरुच ठेवला आहे. श्रीरामपूरांसाठी ही वेगळी मेजवाणी असल्याने अनेकांचे पाय या स्टॅालकडे वळत आहे.

थंडगार हॅवमोर आईसक्रीम
वाढत्या उष्म्यामुळे थंड पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेवून कोपरगाव येथील प्रतिक बोरावके यांनी हॅवमोर आईसक्रीम उपलब्ध केले.

मसाला पानाची गोडी
औरंगाबाद पान सेंटरच्या सुमारे आठ फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेले पान खाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

भाग्यवान ग्राहक
काल दि. 27 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये खालील ग्राहक भाग्यवान ठरले.
किशोर लबडे, जयश्री काळे, स्वामीनी यादव, अनिल मानधना, ऋतुजा राजू झरेकर, सुवर्णप्रभा भा. गुंड, बाळकृष्ण शांतीलाल गौड, सौ. विजया राजेंद्र बोरुडे, अथर्व राहुल जेजूरकर, ज्योती गणेश चव्हाण.  या महोत्सवात भेट देणार्‍या ग्राहकांमधून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने 10 भाग्यवान ग्राहकांची निवड करुन या ग्राहकांना दै. सार्वमतच्यावतीने आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे. विजेत्या ग्राहकांनी आपली बक्षिसे शनिवार दि. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता थत्ते मैदान येथून घेवून जावी.

आज ग्रुप डान्स स्पर्धा
दि. 27 फे्रबुवारी रोजी झालेल्या खुली ‘सोलो डान्स’ स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. आज दि. 28 फेब्रुवारी रोजी ‘ग्रुप डान्स स्पर्धा’ होणार आहे. दि. 29 फेब्रुवारी ‘आर्केट्रा बॉलीवूड धमाका’ तर 1 मार्च 2020 रोजी ‘रंग लावण्यांचे’ हा बहारदार लावणी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *