Friday, April 26, 2024
Homeनगरvideo : मनोरंजनाची बदलती दुनिया आश्वासक!

video : मनोरंजनाची बदलती दुनिया आश्वासक!

सार्वमत
नाट्य-सिनेसृष्टीतील मान्यवरांचा सूर  : बदल स्वीकारावे लागतील
अहमदनगर (प्रतिनिधी) – करोनाच्या लॉकडाऊनमुळे जनता घरात अडकली आणि त्यांच्या मनोरंजनाची दिशाही बदलली. टिव्ही आणि स्मार्टफोन भारतीयांच्या मनोरंजनाला नवे वळण देत असताना आताची स्थिती त्यांना वेगाने याकडे घेवून गेली. सिनेमा, नाटकासोबत वेबसिरीजच्या दुनियेत सुरू झालेले प्रयोग आश्वासक असून विषय, कथा, अभिनय आणि दिग्दर्शन हेच आता ‘हिरो’ ठरत आहेत. एकप्रकारे या क्षेत्रातील प्रतिभावंतांसाठी ही आश्वासक बाब आहे, असे मत नाट्य-मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी नोंदवले आहे.
सोमवारी सोशल मिडीयावर थेट प्रक्षेपित झालेल्या ‘सार्वमत संवाद कट्टा’ या उपक्रमात झी चित्रपट अवॉर्ड विजेते ज्येट्य नाट्यकर्मी मोहिनीराज गटणे, ‘भागो मोहन प्यारे’फेम अभिनेते क्षितीज झावरे, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांय नजान, रंगभूषाकार चंद्रकांत सैंदाने सहभागी झाले. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात घरी अडकलेल्यांनी स्ट्रीमिंग साईटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
नव्या-जून्या चित्रपटांसह वेबसिरीज या प्रेक्षकांत लोकप्रिय ठरलेल्या प्रकाराने या काळात अनेकांचे मनोरंजन केले. यापुढी काळात चित्रपट ऑनलाईन स्वरूपातच प्रदर्शित होतील, याची चुणूक दिसून आली आहे. आधीपासून तशी तयारी सुरू होती. आता त्या प्रयत्नांना वेग येईल. कलावंत, लेखक, दिग्दर्शकाची प्रतिभा हाच यापुढे मनोरंजनाचा केंद्रबिंदू असेल. त्यातुळे ज्याच्याकडे अंगभूत कलागुण असतील, त्यांना पुढे जाण्याची संधी आहे. नगरचे कलावंतांनी याआधीच स्वत:ला सिद्ध केले आहे. यापुढे आपल्याला संधी घेण्याचा चाणाक्षपणा दाखवावा लागेल, यावर या मान्यवरांनी लक्ष वेधले.
…………
प्रतिभा असलेल्यांना नाट्य-चित्रपटसृष्टीने याआधीही तारले आहे. मात्र बदलत्या काळाची पावले ओळखून नवे प्रयोग नक्कीच करावे लागतील. प्रेक्षक अभिरूची जपूनच होते. आता त्यांना नवी माध्यमे खुली झाल्याने कलाक्षेत्रही आपल्यात बदलत आहे.
-मोहिनीराज गटणे
………
ऑनलाईन स्ट्रिमींग साधनांच्या निमित्ताने मनोरंजनाचा खजीनाच प्रेक्षकांच्या हाती आला आहे. आपल्या आवडीचे तेच बघण्याची सोय झाली आहे. जगभरातील सर्वोत्तम चित्रपट-मालिका उपलब्ध झाल्याने भारतीय प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणार आहे. त्यानुरूप बदल क्रमप्राप्त आहे.
-क्षितीज झावरे
……..
नगरकडे अभिनेते, कथालेखक, दिग्दर्शक, चित्रीकरण स्थळ आणि तंत्रज्ञांची चांगली टिम उपलब्ध आहे. एखाद्या उत्तम चित्रपटाची एकट्या नगरच्या कलावंतांच्या जोरावर निर्मिती होवू शकते. आगामी काळात यादृष्टीने नक्कीच सकारात्मक पावले पडतील.
-शशिकांत नजान
………
वेब आणि टिव्ही मालिकांचे काम वाढले आहे. यापुढेही ही संख्या मोठी असेल. त्यामुळे पडद्यामागे राबणार्‍या हातांसाठीही मोठी संधी असेल. रंगभूषाकारांसाठी नवे विषय, नवी मांडणी हे आव्हान आहे. मात्र या कामात आनंदही आहेच.
– चंद्रकांत सैंदाणे
- Advertisment -

ताज्या बातम्या