संगमनेर : सार्वमत जिनियस एज्युकेशन फेअरचा शानदार शुभारंभ

0

दि. १५ व १६ रोजी विद्यार्थी व पालकांसाठी खुले

संगमनेर येथे सार्वमत जिनियस एज्युकेशन फेअरचे गुरुवारी मालपाणी लॉन येथे शानदार शुभारंभ झाला.

माजी शिक्षण व महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी उदघाटन केले. आ. सुधीर तांबे या कार्याक्रमाचे अध्यक्ष होते.

डॉ संजय मालपाणी, जिल्हा परिषद कृषी सभापती अजय फटांगरे, संजीवनीचे सुमित कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती.

अमृतवाहिनी इंजिनियरिंग महाविद्यालय, एस. एम. बी. टी. महाविद्यालय व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत.

प्रदर्शन गुरुवार (दि. १५) व शुक्रवारी (दि १६) रोजी विद्यार्थी व पालकांसाठी खुले आहे.

LEAVE A REPLY

*