अहमदनगर : जिल्ह्यातील 84 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी; पालकमंत्री शिंदे यांची माहिती

0

अहमदनगर : जिल्ह्यातील 84 हजार शेतकर्‍यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांना दिली. मंगळवारी शिंदे नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

जिल्ह्यातून दोन लाख 63 हजार जिल्हा सहकारी बँकेचे कर्जदार शेतकरी, एक लाख 24 हजार राष्ट्रीयकृत आणि इतर बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी आंतिम करून सरकारला पाठवण्यात आली होती. पैकी 84 हजार शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत शिंदे म्हणाले की, आमच्यावर टीका करणार्‍यांनी त्यांचे सरकार अस्तित्वात असताना शहरातील पुलासाठी काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या लोकांनी उड्डाणपुलाचे काम बंद पाडल्याचे प्रत्यूत्तर सत्यजित तांबेंचे नाव न घेता दिले.

उड्डाणपुलाचा नवा मुहूर्त

येत्या 29 तारखेला केंद्रीय मंत्री संगमनेर दौर्‍यावर आहेत, यादिवशी त्यांना नगरला आणण्याचे नियोजन आहे. यावेळी उड्डाणपुलाची घोषणा होण्याची शक्यता त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील सर्वच महामार्गासाठी पॅकेज जाहीर करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*