वीज जोडणी नसतानाही बिल आल्याने ‘शॉक’

0
भोकर(वार्ताहर) – वीज जोडणी नसतानाही बिल आल्याने अशोक किसन शिंदे यांना आश्‍चर्याचा ‘शॉक’ बसला आहे. स्वत:च्या नावावर घर नाही, शेती नाही आणि विशेष म्हणजे कोणत्याही वीज संस्थेचा सभासद नाही, वीज वितरणचा तर मुळीच संबंध नाही अशा व्यक्तीस वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेती व वीज पंपाच्या नावाने शंभर नाही दोनशे नाही तर तब्बल 38 हजार रुपयांचे विज बिल पाठविले. एवढ्या मोठ्या रकमेचे वीज बील पाहून ती व्यक्ती चक्रावून गेली.

वीज वितरणच्या अजब कारभारामुळे नाहक गरिबांच्या जिवावर उठणार्‍या प्रसंगास कोण जबाबदार राहिले असते? असा सवाल यावेळी करण्यात आला. वीज वितरणच्या अजब कारभारामुळे सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात जसे माझी विहीर हरवली आहे ती शोधून देता का? अशाच पध्दतीने माझी हरवलेली शेती, वीज पंप शोधून देता काय? अशी म्हणण्याची वेळ त्या इसमावर आली आहे. आता कारवाई कोणावर वीज बिल भरायला लावणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यावर का? या इसमावर? अशी चर्चा गावात सगळीकडे चालू आहे.

या शेती पंपाच्या विज बिलाचा गठ्ठा नेहमी प्रमाणे गावात एका ठिकाणी आलेला होता. तेथून शेतकरी आपआपले विज बिल शोधून नेत होते. त्यांच्या मित्राला अशोक किसन शिंदे नावाचे बिल दिसले त्यांना लागलीच त्यांना संपर्क करून बिल नेण्यास सांगीतले. हा प्रकार काही वेळ शिंदे यांनी मस्करी समजून दुर्लक्षीत केले पण पुन्हा निरोप मिळाल्याने ते तेथे गेले तर चक्क अशोक किसन शिंदे, भोकर नावाने बिल दिसले आणि त्यांनाच काही सुचेना असे झाले.

त्यावर त्यांनी संबधित बिल घेऊन स्थानिक वायरमनला दाखविले त्यांनी शिंदे यांना ही सरकारी बाकी आहे वेळीच लक्ष घाला अन्यथा तुम्हाला भरा चुकणार नाही. प्रसंगी उतार्‍यावर बोजा चढेल असे धमकावत श्रीरामपूरचा रस्ता दाखविला. श्रीरामपूर येथे महावितरणच्या कार्यालयात गेले असता तेथे सबंधित अभियंता यांनी तुम्ही येथे कशाला आलात तुमच्या साठी भोकर सबस्टेशन येथे स्वतंत्र कार्यालय आहे तेथे जा असे सांगितले.

तेथे गेले असता आम्ही चौकशी करून तुम्हाला कळवितो असे सुचविण्यात आले पण अद्याप त्याचा खुलासा झाला नाही. शिवाय आणखी एखादी व्यक्ती आहे काय? हे ही स्वत: शिंदे यांनीच शोधले असता या नावाने भोकर गावातच नव्हे तर परिसरात कुठेच अशोक शिंदे या नावानची व्यक्ती नसल्याचे त्यांना समजले.

याबाबत याकार्यालयाशी संबधित प्रतिनिधीनी संपर्क साधला असता काही वेळाने आम्ही सदरचे बिल मुळाप्रवराकडून आलेल्या कोटेशन यादी आली त्याप्रमाणे पाठवितो असे सुचविले. यानंतर एवढा मनस्ताप सहन करून असलेल्या शिंदे हे आता महावितरणकडे मी तुमची 38 हजाराची बाकी भरण्यास तयार आहे परंतु मला माझी शेती व वीज पंप शोधून द्या अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असे सुनावत पुन्हा घरी परतावे लागले.

दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी चुकीचे रिडींग दिल्याचे नावाखाली विज मिटरची रिडींग करणार्‍या एजन्सीवर महावितरणने राहुरी तालुक्यातील एका ठेकेदाराविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातही अशाच प्रकारे दोन ठेकेदाराविरूद्ध शहर व तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारचे चुकीचे बिल येण्यास महावितरणचे कार्यालय जाबदार असल्याचे संबधीतांचे म्हणने आहे.

कारण आमचे काम केवळ विजेच्या मिटरचा फोटो घेणे तो कार्यालयात पोहच करणे आणि त्यावरील रिडींग पोहच करणे असे काम आहे. ज्याबिलाबात चुक किंवा संशयीत वाटेल तेथे महावितरणने स्वतंत्र क्रॉस चेकींगसाठी पथक नेमले असतानाही अशा प्रकारे क्रॉस चेकींग घेऊन संबधीताला दंडासह वसुली केली जावू शकते शिवाय का आल्यास तपासणी करून योग्य तेच बिल देण्यासाठी ही यंत्रणा असताना तसे होतच नाही. अनेकांना चुकीचे बिल येतात मग खरे दोषी कोण रिडींग घेणारे ठेकेदाराचे कर्मचारी की विज बिल बनविणारे कर्मचारी की क्रॉस चेकींग करणारे पथक असे अने प्रश्‍न आहेत.

भोकर येथे राहणार्‍या अशोक किसन शिंदे यांच्यानावाने भोकर गावात कुठलेही शेतजमीन किंवा घराचाही उतारा नाही. जे घर व शेती आहे ते त्यांचे वडील स्व. किसन बाबुराव शिंदे यांच्या नावाने आहे. मात्र या शेतात साधी विहीर ही खणलेली नाही किंवा बोअरवेलही नाही त्यामुळे विज पंपाचा संबधच येत नाही, असे असतानाही शिंदे यांच्या नावाने महावितरणनेे चक्क अशोक किसन शिंदे या नावाने तीन एच.पी. विजपंपाचे सप्टेबर 2017 या महिन्याचे 38 हजार पन्नास रूपयांचे विज बिल आले आहे.

LEAVE A REPLY

*