संगमनेर : सरकारने दुधाला 5 ते 7 रु.प्रतिलिटर अनुदान द्यावे : आ.बाळासाहेब थोरात 

जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना द्या थोरात सरकारने

0

संगमनेर : श्‍वेत क्रांतीमुळे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून दुध उत्पन्न वाढले आहे. सध्या खाजगी दुध संघ शेतकर्‍यांना कमी भाव देत असून सहकारी दुध संघ मात्र नियमाप्रमाणे भाव देत आहे.यामुळे दोन्ही संघांच्या विक्रीत मोठी तफावत होत असून अतिरिक्त दुधावर पर्याय म्हणून शासनाने प्रतिलिटर दुधाला किमान  5 ते 7 रुपये अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते मा.महसूल व कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंती शताब्दी निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले कि, दुध व्यवसायाने ग्रामीण भागातील कौटुंबिक व अर्थव्यवस्था मजबूत केली आहे.या दुध व्यवसायाला सरकारने पालकत्वाची भूमिका घेत मदतच केली पाहिजे.सध्या रायात दुधाचे उत्पादन वाढले आहे.अशा वेळी सध्या खाजगी दुध संघ मनमानीपणे 18 ते 19 रुपये भाव देत आहे.मात्र सहकारी दुध संघ शेतकर्‍यांना नियमाप्रमाणे भाव देतो.कमी भावामुळे खाजगी लोक कमी भावातच दुध विक्री करतात.त्यामुळे सहकारी दुध संघांच्या दुधाची विक्री कमी होते.यामुळे सहकारी दुध संघांची परिस्थिती अडचणीची झाली आहे. अशी स्थिती राहिल्यास सर्व सहकारी दुध संस्था मोडकळीस येतील.त्यांना जाणीवपूर्वक मदत करतांना शासनाने प्रतिलिटर 5 ते 7 रुपये अनुदान दिले पाहिजे.

LEAVE A REPLY

*