नगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन?

0

कोकमठाणच्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांची घोषणा

कोपरगाव (प्रतिनिधी)– क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठ्या असणार्‍या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याचे संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. जिल्ह्याच्या विभाजनाची लोकांची मागणी लवकरच राज्य सरकार पूर्ण करणार असल्याची घोषणा राम शिंदे यांनी केल्याने नगरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोपरगावजवळील कोकमठाण येथे कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.

क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याचे दोन भागात विभाजन होणार आहे. नगर दक्षिण आणी उत्तर अशा दोन भागात जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे आणि सध्या प्रशासनालाही एवढ्या मोठ्या जिल्ह्यात सुविधा देण्यास अडचणी येताहेत त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचा दावा राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय.

साडेतीन वर्षांपूर्वी शिवसेना विरोधी पक्षात होती ते सत्तेत कधी आले हे त्यांना अजूनही कळलंच नाही. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असून जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून भाजपा 2019 ला पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. 

LEAVE A REPLY

*