अहमदनगर : भाजप सरकार आज स्थिर, उद्याचे सांगू शकत नाही : आ. नीलम गोर्‍हे

भाजपची सनात भूमिका सेनेला अमान्य

0

भाजपची सनात भूमिका सेनेला अमान्य

अहमदनगर : शिवसेनेचे हिंदूत्व हे प्रबोधनकारी आहे. उत्तरप्रदेश- मध्येप्रदेश मधील शाकाहार, मांसाहाराच्या वादात शिवसेना पडत नाही. मात्र, सनात भूमिकाही शिवसेनेला अमान्य असून याचा कत्तलखान्यांना सेनेची मान्यता आहे, असे नाही. राज्यातील सरकार आज स्थिर आहे, पण उद्या काय स्थिती राहिल हे सांगू शकत नाही. सरकारच्या कामगिरीविषयी आम्ही जरूर अस्वस्थ आणि नाराज आहोत. सरकारमध्ये राहून शिवसेना ही मांजर झालेली नसून, वाघ तो वाघच राहतो. हे दाखविण्यासाठी 2019 च्या निवडणुकांचे घोडामैदान लांब नाही, असा विश्‍वास शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नगरमध्ये व्यक्त केली.
औरंगाबाद दौर्‍यावर असणार्‍या आ. गोर्‍हे रविवारी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. आ. गोर्‍हे म्हणाल्या, राज्य सरकारमध्ये सत्तेत राहून शिवसेनेची घुसमट सुरू आहे. 1995 मध्ये युतीचे जे सरकार होते, त्याची अनुभूती आजच्या सरकारमध्ये नाही. आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळ्यांमुळे जनतेमध्ये त्यावेळच्या सरकारविषयी प्रचंड रोष होता. सुप्रशासन देऊ असे आश्वासन देत भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जवळ आले. पण, या सरकारने जनतेची प्रत्येक क्षेत्रात फसवणूक केली. अस्थिरत्येच्या गर्गेत लोटले. जोपर्यंत जनतेमधील या सरकारविषयी घुसमट आहे, तोपर्यंत शिवसेनेचा सरकार विरुद्धचा संघर्ष थांबविणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना प्रबोधनकारी हिंदूत्वाचा स्वीकारणार करणारी आहे. त्यामुळे सत्तेत राहून शिवसेनेने हिंदूत्व सोडले, ही फसवी अफवा आहे. सनातनी हिंदूत्व शिवसेनेला मान्य नाही, असे सांगून सरकारच्या धोरणांवर आम्ही जरूर अस्वस्थ आणि नाराज असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भारतीय जनता पक्षाविरोधात असलेल्या समविचारी पक्ष प्रमुखांबरोबर सध्या बैठका आणि गाठीभेटी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना राज्यात एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. पक्ष आहे. तिच्यावर कोणीही निर्णय लादू शकत नाही. कश्मीर प्रश्न, बाबरी मशिद, बेळगाव प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र, वंदे मात्र्म, शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आणि सर्वसामान्यांसाठी दिलेल्या वचननाम्यावर शिवसेना आजही ठाम आहे. राजकारण हे एका पातळीवर करावे लागते. राजकारणा पलीकडे देखील एखाद्या पक्ष प्रमुखांच्या गाठीभेटी होऊ शकतात. शिवसेना ही वाघ आणि वाघच राहिल, असे सांगून शिवसेनेने सत्तेत राहून लोकाभिमुख निर्णय घेण्यास या सरकारला भाग पाडले आहे. कर्जमुक्तीसारख्या विषयावर शिवसेनाच आक्रमक होती, आ. गोर्‍हे यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे शिवसेनेसाठी नगण्य विषय
नारायण राणे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, यावर डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने नगण्य विषय आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात इतरांपेक्षा चांगला सुसंवाद असल्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. तसेच गृहखात्याला स्वतंत्र मंत्री असावा यावर शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे हे बोलतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*