साईआश्रमातील रुमला आग; 18 सेवेकरी बचावले

0

 1 लाख 10 हजारांचे नुकसान 

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- संस्थानच्या साई आश्रम फेज 2 मधील रुममधे वीजेच्या शॉर्टसर्कीटने आग लागून संस्थानचे 1 लाख 10 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. संस्थानच्या फायरफायटरने आग आटोक्यात आणल्याने मोठी जिवीतहानी टळल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.
गुरुवारी पहाटे साईआश्रम फेज 2 मधील बी.ब्लॉक मधील बंद रुममधून धूर बाहेर पडू लागल्याने याठिकाणी कामास असलेले सुपरवायझर महेश घोरपडे व स्वच्छता कर्मचारी नितीन पगारे यांच्या निदर्शनास आल्याने तातडीने घटनेची खबर प्रभारी अधीक्षक कैलास घायदार यांना दिली. यावेळी साईसंस्थानच्या फायरफायटरला पाचारण करून बंद असलेला रूमचा दरवाजा तोडण्यात आला.
अग्नीशामक सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. यावेळी निमगाव कोर्‍हाळे येथील कामगार तलाठी श्री. झेंडे यांनी घटनेचा पंचनामा करून 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी या रूममध्ये आंध्रप्रदेश येथील के. वाणी, धनलक्ष्मी, आर. गांधवी, शामलाकुमारी, माधवी, केसरीदेवी, आर रजनी, व्यंकटलक्ष्मी, पी.लक्ष्मी राजेश्वरी,
एन.रानी, के.सुनीता, एम.सत्यवती, ए.पावनाकुमारी, लक्ष्मीबाई, डी. पद्मावती आदी 18 जण वास्तव्यास होते. सुदैवाने पहाटे 5 वाजता सर्व साईसेवक आपआपल्या नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी गेले असल्याने जिवीत हानी झाली नाही. या आगीत साईसेवकांचे बँगा, कपडे, पुस्तके, मनीपर्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, ओळखपत्रे, 2 बॅग कपडे व जिवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याचे समजले.

 

LEAVE A REPLY

*