शेतकरी कर्जमाफी योजना : दुसर्‍या ग्रीन लिस्टमधील 36 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी सुरू

0

जिल्हा बँकेच्या खात्यावर 403 कोटी रुपयांची रक्कम वर्ग

अहमदनगर (प्रतिनिधी)– रखडत रखडत सुरू असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीस पात्र असणार्‍या दुसरी ग्रीन लिस्ट सोमवारी जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. या लिस्टमधील मधील 35 हजार 997 शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. खात्यांची तपासणी झाल्यानंतर कर्जमाफीचे पैसे खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. शासनाकडून जिल्हा बँकेला 403 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

कर्जमाफीसाठी शासनाने सुरुवातीला पहिली ग्रीन लिस्टफ तयार केली होती. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3 हजार 256 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यांच्या कर्जमाफीसाठी 17 कोटी 25 लाखांची रक्कम बँकेच्या खात्यावर शासनाने जमा केली. 2 हजार 301 शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर 12 कोटी 24 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

अजूनही जवळपास 5 कोटींची रक्कम 955 शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणे बाकी आहे.दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये जिल्हा बँकेच्या 77 हजार 939 शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 395 कोटी 66 लाखांची कर्जमाफी होणार आहे. शासनाने त्यातील 386 कोटी 21 लाखांची रक्कम बँकेच्या खात्यावर जमा केली. 77 हजार शेतकर्‍यांपैकी 41 हजार 942 शेतकर्‍यांच्या खात्यांची तपासणी पूर्ण झाली.

दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये असणार्‍या नावाची पडताळणी करण्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाला साधारण आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही पडताळणी झाल्यानंतर कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यातही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याचे बँकेच्या प्रशासानाकडून सांगणयात आले. 

LEAVE A REPLY

*