जिल्हास्तरीय फॅशन शोमध्ये 150 स्पर्धकांचा सहभाग

0

मिस श्रीरामपूर-विश्‍वा गोधा, रिता माटा, करिश्मा राजपाल, खुशबु ताराणी
मास्टर श्रीरामपूर-देवांशू म्हस्के, झोरावरसिंग चुग, हार्दिक शाह हे मानकरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील श्‍वेता कुंकूलोळ, प्रितेश कुंकूलोळ आयोजित दिग्दर्शित जिल्हास्तरीय फॅशन शोधमध्ये एकूण 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात मिस श्रीरामपूर म्हणून विश्‍वा गोधा, रिता माटा, करिश्मा राजपाल, खुशबु ताराणी तर मास्टर श्रीरामपूरमध्ये देवांशू म्हस्के, झोरावरसिंग चुग, हार्दिक शाह यांनी बाजी मारली.

या स्पर्धेचे उद्घाटन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधिक्षक अरुण जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जि. प. सदस्य शरद नवले, सौ. आशाताई दिघे, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, सुधीर नवले, सिध्दार्थ मुरकुटे, नगरसेविका स्नेहल खोरे, मंजुश्री मुरकुटे, पोलीस निरीक्षक वसंतराव पथवे, भरत कुंकूलोळ, प्रेमचंद कुंकूलोळ, सतिश कुंकूलोळ, कल्याण कुंकूलोळ, भगवान कुंकूलोळ, सुनिल साळवे, दिनेश तरटे, वैभव लोढा, आदी मान्यवर उपस्थित होते.

मिस श्रीरामपूरमध्ये अ गट-विश्‍वा गोधा, ब गट-रित माटा, क गट-करिष्मा राजपाल, ड गट- मिस टीनमध्ये- खुशबु ताराणी,श्रेया देशमुख, रिसिका छल्लाणी, तनिषा वर्मा, सातनवी बडधे, अशिष क्षीरसागर, प्रभलिनकौर चुग, हर्षवी चोथाणी, हर्षीने धुपर, साक्षी आंबेकर, दर्शन टाटीया, सेसिका गुलाटी, मूदाणी चोथाणी, आकांक्षा घुले, साक्षी भवार, हर्षमितसिंग चुग, श्रुती तोरणे, सिंपली जोशी, जि खामकर, बलविनकौर कथुरिया, साक्षी कुंकूलोळ, मोक्षा टाटीया, आरती छाजेड आदिंनी बक्षीसे पटकाविली.

मास्टर श्रीरामपूर-देवांशु म्हस्के, ब गट-झोरावरसिंग चुग, क गट- हार्दिक शाह यांनीही बाजी मारली.
या स्पर्धेसाठी रामअवतार, नयन कलेक्शन, प्रभात डेअरी, एच.यु. गुगळे, पी. के. भंडारी, झेड. पी. बाफना, केशव प्रोसेसर, लिटर एंजल स्कूल, आस्था हॉस्पिटल, साई बालाणी ट्रेडर्स, दुधेडिया एजन्सी, सिल्वहर स्पून हॉटेल, सोनिया ट्रेंडस आदिंनी बक्षीसे ठेवली होती.

पंच म्हणून निलिमा जैनव अभिषेक यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन श्‍वेता कुंकूलोळ यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतिश कुंकूलोळ, भरत कुंकूलोळ गोलू कुंकूलोळ, कल्याण कुंकूलोळ आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*