#Sarvmat Breaking : राहुरी : गुहा परिसरात जळालेला मृतदेह आढळला; स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी PM करण्यास दिला नकार

0

अहमदनगर (राहुरी) : नगर-मनमाड रस्त्यावर गुहा परिसरात आज सकाळी एका मुलाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

परिसरात घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे.

जळालेला मृतदेह मुलाचा असून त्याचे वय 12 असावे असा अंदाज बांधला जात आहे.

तो गुहा परिसरात चालणाऱ्या अवैध हॉटेल व्यवसायाचा बळी आसल्याची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.

LIVE UPDATE : 

पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, ठसे तज्ञ, श्वान पथक, फॉरेंसिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतदेह गोणीत भरुन आणला आसावा नंतर पेट्रोल टाकून जाळला असा प्राथमिक अंदाज आहे.

हद्दीवरून वाद झाल्याने स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शव विच्छेदन (Post Martum) करण्यास नकार दिला .

प्रवरा ग्रामीणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणायला पोलिस रवाना झाले आहेत. 

LEAVE A REPLY

*