अहमदनगर : कोपर्डी प्रकरण : आजपासून दोन दिवस शिक्षेवर युक्तिवाद

0

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात न्यायालयाने शनिवारी (दि.18) तिघांना दोषी धरले आहे.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यावर अत्याचार व खुनाचा आरोप ठेवण्यात आला असून संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांवर कट रचणे, गुन्ह्यास प्रवृत्त करणे, छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार असे आरोप ठेवण्यात आले आहेत. असा निर्णय जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दिला आहे.

आज मंगळवार (दि. 21) व बुधवार (दि. 22) नोव्हेंबर रोजी दोन दिवस शिक्षेवर युक्तिवाद होणार आहे.

  • खटल्याची 42 वेळा सुनावणी
    20 नोव्हेंबर 2016 पहिली साक्ष नोंदवली
    22 नोव्हेंबर मूळ फिर्यादीची साक्ष
    2 ते 5 जानेवारी 2017
    13 ते 15 जानेवारी, 17 जानेवारी, 20 मार्च, 17 मार्च, 1 एप्रिल 17 एप्रिल, 5 मे, 22 मे, 23 मे, 24 मे, 22 ते 26 जून, 7 जुलै, 10 जुलै, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीचा अर्ज फेटाळला, 17 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, रवींद्र चव्हाणची साक्ष, 16 सप्टेंबर, 11 आक्टोबर, 22 आक्टोबर 2017, 26 आक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर अंतिम अहवाल, 18 नोव्हेंबरला शिक्षेवर सुनावणी सुरू.
  • 21 व 22 नोव्हेंबरला दिवस शिक्षेवर युक्तिवाद

सबंधित बातम्या :

कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपी दोषी

कोपर्डी : स्पेशल स्टोरी

LEAVE A REPLY

*