Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

सार्वमत लाईव्ह कट्टा: विश्‍वचषक भारतच जिंकणार! क्रिकेटतज्ज्ञांचा विश्‍वास : धोनी, विराट, रोहित ठरतील हिरो

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – मध्यावर असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रीका, पाकीस्तानसारख्या संघांचे आव्हान धोक्यात असताना भारतीय संघ अपराजित कामगिरीसह वर्चस्व गाजवत आहे. दमदार फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि सर्वोत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण या जोरावर 2019ची विश्‍वचषक स्पर्धा भारतीय संघच जिंकेल, असा विश्‍वास नगरमधील क्रिकेटतज्ज्ञांनी व्यक्त केला.

‘सार्वमत संवाद कट्टा’ या विशेष फेसबुक लाइव्ह चर्चेत नगरचे क्रिकेटतज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक सुधीर चपळगावकर, क्रिकेट प्रशिक्षक प्रा. श्रीकांत निंबाळकर आणि जुन्या काळातील अष्टपैलू क्रिकेटपटू सुहास माळवदे सहभागी झाले. ‘विश्‍वचषक आणि भारतीय संघ’ या विषयावर ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी त्यांना बोलते केले. सध्याचा भारतीय संघ हा आजवरचा सर्वाधिक संतुलीत संघ आहे. कर्णधार विराट कोहली, सलामीचा फलंदाज रोहित शर्मा, अनुभवी महेंद्रसिंग धोनी, ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अशी सर्वोत्तम खेळाडूंची फळी सध्या भारतीय संघाकडे आहे. त्यामुळेच विजेतेपदाचा दावेदार म्हणून भारतीत संघाकडे पाहिले जाते. या संघाला सातत्याने विजयाची सवय आहे. त्यामुळे विश्‍वचषक जिंकणारच, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचंड सरावाने भारतीय संघ तयार झाला आहे. एक खेळला नाही, तर दुसरा पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करताना दिसतो. भारतीय क्रिकेट सध्या सर्वोत्तम स्थानी आहे. संघाची कामगिरी विश्‍वचषक स्पर्धेतही अधिक खुलत चालली आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजयाचा सर्वात मोठा दावेदार विराटचा संघच ठरतो.
-सुधीर चपळगावकर

क्रिकेटला व्यावसायिक रूप देण्याचा निर्णय किती योग्य होता, हे भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीतून स्पष्ट होते. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला श्रेय दिलेच पाहिजे. आज भारतात क्रिकेटचे स्पर्धात्मक रूप सर्वाय अधिक आणि यशस्वी आहे. लीग क्रिकेट ते आयपील असे सर्व फॉर्माटमध्ये उत्तम क्रिकेटपटू घडत आहेत. त्याचे प्रतिबिंब भारतीय संघ आहे.
-प्रा.श्रीकांत निंबाळकर

खेळ दाखवला तरच संधी, ही एकप्रकारे खेळाडूंना उर्जा देणारी बाब ठरली आहे. भारतीय संघात जागा मिळविण्यासाठी आता उत्तम क्रिकेटशिवाय दुसरा पर्याय नाही. आजचा संघ सर्वोत्तम आहे. मग तो विश्‍वचषक जिंको अथवा न जिंको! हा खेळ अनेकदा अनपेक्षीत निकाल घडवितो. मॅचचा दिवस कोणाचा, हे म्हणून महत्त्वाचे ठरते. यजमान ऑस्ट्रलिया संघ काही प्रमाणात आव्हान देताना दिसेल.
-सुहास माळवदे

Daily Sarvmat यांनी वर पोस्ट केले शनिवार, २२ जून, २०१९

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!