Type to search

Featured Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी – संकल्पना सत्यात उतरविणार्‍या सोनल अग्रवाल

Share

सौ. सोनल अग्रवाल – श्रीरामपुर, आर्किटेक्चर (वास्तू विशारद).

  • द्यापीठात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सुवर्णपद प्राप्त
  • ‘बेस्ट एम्प्लॉयी’ पुरस्काराने सन्मानित
  • नीव डिझायनर नावाने स्वत:चा व्यवसायास प्रारंभ

अकोला येथील शिवाजी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सन 2006 मध्ये बी. आर्क. ची पदवी घेतली. त्यामध्ये अमरावती विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने तसेच विदर्भ असोसिएशनने सोनम अग्रवाल यांना गौरविले. नंतर पुणे येथे गोयल गंगा ग्रुप या बांधकाम कंपनीत नोकरी करुन मोठा अनुभव आत्मसात केला. त्या अनुभवाचा उपयोग आपल्या व्यवसाय उभा करण्यासाठी केला.

शालेय जीवनापासून अत्यंत हुशार असलेल्या सोनल अग्रवाल यांनी उत्तमरित्या आपले शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेची आवड असल्याने अकोला येथील शिवाजी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये त्यांनी 2006 मध्ये बी. आर्क. ची पदवी घेतली. अगोदर त्यांनी खाजगी कंपनीमध्ये नोकरी करुन पती निखिल अग्रवाल यांच्या सहकार्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. अत्यंत संघर्षमय वाटचालीतून त्यांनी आपला व्यवसाय नावारुपाला आणला.

विदर्भातील अकोला येथे सौ. सोनल अग्रवाल यांचा जन्म 1983 साली झाला. श्री. ओमप्रकाश गोएंका हे त्यांचे वडील एका आडत दुकानात नोकरीस होते. सुमारे आठ जणांचे कुटुंब असल्याने तुटपुंज्या भांडवलामध्ये कसेबसे कुटुंब चालवावे लागत. परंतू म्हणतात ना ‘मुली लक्ष्मीच्या पावलांनी घरात येतात’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या वडिलांनी छोटा व्यवसाय सुरु केला व कालंतराने तो वाढविला. नंतर त्यांनी कुटुंबाला काहीही कमी पडू दिले नाही. सर्व भावंडांना उत्तम दर्जाचे शिक्षणही दिले.

सोनल यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. त्यांना चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी अकोला येथील शिवाजी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये बी. आर्क. ची पदवी 2006 मध्ये घेतली. त्यामध्ये अमरावती विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने तसेच विदर्भ असोसिएशनने त्यांना सुवर्ण पदकाने गौरविले. सन 2008 साली त्यांचा विवाह श्रीरामपूर येथील सिव्हिल इंजिनियर निखिल अग्रवाल यांच्याशी झाला.

विवाहानंतर दोघेही पती-पत्नी एकाच क्षेत्रातील असल्यामुळे त्यांनी पुणे येथील गोयल गंगाग्रुप या बांधकाम कंपनीत नोकरी सुरु केली. त्या कालावधीत त्यांनी पुण्यातील अनेक उत्तुंग व विस्तीर्ण बांधकाम प्रकल्पांची रचना (डिझाईन) केली. त्यांचे काम बघून कंपनीच्या वताने त्यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुण्यातील कामाचा अनुभव असल्याने व बांधकाम क्षेत्रात काहीतरी नवीन करावे या उमेदीने सन 2013 मध्ये श्रीरामपूर येथे स्वतःचे पशर्शीं वशीळसपशी या नावाने काम सुरु केले. प्रारंभी अनेक दिवसाच्या संघर्षानंतर त्यांना मुद्रा रेसिडेन्सी या प्रकल्पाची रचना करण्याचे काम मिळाले.

आणि तो प्रकल्प इतका सुंदर व आकर्षक ठरला की, पहिल्या काही दिवसातच प्रकल्पातील घरांची नोंदणी झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एका मागोमाग एक प्रकल्पाचे काम त्यांना मिळत गेले. त्यामध्ये मेनरोडवरील साईश्रद्धा कॉम्प्लेक्स, बेलापूर रोडवरील केतकी ड्रीम्स, नीलकंठ हाईट्स, नीलकंठ ड्रीम्स आदी मोठमोठ्या प्रकल्पांची रचना त्यांनी केली. त्यात केतकी ड्रीम्स हा प्रकल्प त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. कारण मुंबई-पुण्यासारख्या घरांचा फील या प्रकल्पातून तेथील रहिवाशांना आला. पुण्यातील सर्व अनुभव त्यांनी पणाला लावून मुंबई-पुण्यासारखे अनुभव श्रीरामपूरकरांना अल्पदरात मिळवून दिले. त्याचवेळी त्यांनी सर्व प्रकल्पांची आधुनिक पद्धतीची रचना केली.

श्रीरामपुरात आर्किटेक व्यवसायात इतकी स्पर्धा असूनही एक महिला असूनसुध्दा लरप । ळ ुळश्रश्र हेच डोक्यात ठेवून फक्त 6 वर्षातच 10 लक्ष वर्ग फुटापेक्षा जास्त 15 हुन अधिक प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पुर्ण केले. सध्या त्यांचे श्रीरामपुरात मेनरोडवर तीन गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांना श्रीरामपूर नगरपालिका व तत्कालीन आमदार, नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांसोबत बांधकाम क्षेत्रातील अनेकांचे सहकार्य लाभले.

श्रीरामपुरात व्यावसाय सुरु केल्याने प्रारंभीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक दिवस काही कामच मिळाले नाही. येथील अनेक गोष्टी माहीत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. नंतर माझे सासरे किशोर अग्रवाल व सासू सौ. सविता अग्रवाल तसेच पतीच्या मदतीने श्रीरामपूरमधील प्रकल्प कशा पध्दतीने सुरु आहेत, येथील नियम माहित करुन घेतले. तसेच नगरपालिकेचे नियम व पध्दतीबद्दल श्री. संजय फंड यांनी माहिती करुन दिली. नंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही.

वाजवी दरात उत्तम घर ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी गेल्या 12 वर्षापासून घेतलेला अनुभव पुर्णत्वाला जावून त्यांनी 2018 साली स्वतः बांधकाम व्यवसायात आपल्या पतीच्या सहकार्याने प्रवेश केला, व श्रीरामपुरात सर्वात भव्य अशा स्वतःच्या प्रकल्पाची सुरुवात करुन अनेक प्रकल्पाची उभारणी केली. इथेच न थांबता आपले श्रीरामपूर हे कसे पुण्यासारखे करता येईल या ध्येयाने यापुढेही काम करुन श्रीरामपूरच्या वैभवात भर घालणार असल्याची त्यांची महत्वकांक्षा आहे.

एक महिला असून देखील श्रीरामपूरसारख्या परिसरात पुरुषांच्या बरोबरीने आर्किटेक्चर (डिझाईनर) म्हणून नीव डिझायनर या नावाने आपला व्यावसाय सुरु करुन मुंबई-पुणे मेट्रोसिटीच्या बरोबरीने येथे अनेक प्रकल्प डिझाईन केले. त्यांनी बनविलेले प्रकल्प यशस्वीही झाले. संघर्षमय वाटचालीतून सोनल अग्रवाल यांनी आपला व्यावसाय उभा करुन आजच्या तरुणींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील तरुणींनीदेखील या क्षेत्रामध्ये येवून आपले करीअर करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी तरुणींना दिला आहे. यापुढेही अशा प्रकारचे अनेक प्रकल्प उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!