विस्थापितांचा राजकीय संघर्ष प्रस्थापितांच्या अंगणात!

0

‘सार्वमत’कडे व्यक्त झाल्या भावना : गढूळ राजकारणाबद्दल चिंता

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – आजवर विस्थापितांच्या वाट्याला येणारा राजकीय संघर्ष आता प्रस्थापितांच्या अंगणात शिरला आहे. राजकीय अवस्थेने गाठलेली ही धोक्याची पातळी!…दोन दिवस ‘सार्वमत’ने प्रसिद्ध केलेल्या ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या दीर्घ चर्चेवरील ही प्रतिक्रिया. आजच्या राजकीय घसरणीचा आणखी एक कोपरा दाखविणारी!

राजीव राजळे या तरुण आणि उमद्या नेत्याचे अकाली निधन झाले. समाजमनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे राजकारणातही एक अस्वस्थता पसरलेली आहे. गडाख यांनी त्यास वाट मोकळी करून दिली. ‘राजीव हे आजच्या राजकीय अवस्थेचे बळी आहेत’ या वाक्याने अनेकांच्या संवेदनशील मनाला धक्का दिला.

अनेकांच्या मनात ते होते, पण बोलत कोणी नव्हते. निधनावर शोक व्यक्त करताना गडाख यांनी एका ओळीत आपली भावना व्यक्त केली होती. पण त्या ओळीचा तळ शोधणे क्रमप्राप्त होते, ‘सार्वमत’ने ते केले. अत्यंत शांतपणे, तोलून मापून शब्द वापरत गडाख व्यक्त झाले आणि जबाबदार माध्यम म्हणून आम्ही तेव्हढ्याच संयमाने ते वाचकांसमोर मांडले. राजीव राजळे या तरुण आणि उमद्या नेत्याचे अकाली निधन झाले.

समाजमनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे राजकारणातही एक अस्वस्थता पसरलेली आहे. गडाख यांनी त्यास वाट मोकळी करून दिली. ‘राजीव हे आजच्या राजकीय अवस्थेचे बळी आहेत’ या वाक्याने अनेकांच्या संवेदनशील मनाला धक्का दिला. अनेकांच्या मनात ते होते, पण बोलत कोणी नव्हते. निधनावर शोक व्यक्त करताना गडाख यांनी एका ओळीत आपली भावना व्यक्त केली होती. पण त्या ओळीचा तळ शोधणे क्रमप्राप्त होते, ‘सार्वमत’ने ते केले.

अत्यंत शांतपणे, तोलून मापून शब्द वापरत गडाख व्यक्त झाले आणि जबाबदार माध्यम म्हणून आम्ही तेव्हढ्याच संयमाने ते वाचकांसमोर मांडले. यावर प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते. पण ज्या पद्धतीने, ज्या संख्येने त्या उमटल्या त्याचा अंदाज आधी नव्हता. गेले दोन दिवस हा विषय समाजमनात चर्चेत आहे. समाजमाध्यमांतही यावर चर्चा झाली. ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेपर्यंतच्या राजकारणात अनेक आशावादी ‘राजीव’ वावरत असतात.

अनेकांचे पुढे काय होते, याकडे पाहण्याची उसंत निष्ठूर राजकारण कधीही दाखवीत नाही. राजीव राजळे यांच्या निधनाने ते पटलावर आले. म्हणूनच गल्लीचे राजकारण करणार्‍या घरांपासून प्रस्थापित मातब्बरांच्या गढ्या या विषयाने हादरल्या. प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रत्येकाचा आपला स्वतंत्र विचार! पण अखेरीस गढूळ राजकारण स्वच्छ करण्याची वेळ आली आहे, यावर एकमत!

या प्रतिक्रियेत एका नेत्याने व्यक्त केलेल्या भावनेने पुन्हा अंतर्मुख करण्याची वेळ आणली. ते म्हणाले, ‘गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत आमच्यासारखे अनेकजण प्रस्थापित राजकारणाविरुद्ध संघर्ष करीत आहेत. आमच्या वाटेला आलेला हा संघर्ष आता थेट प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतही शिरला आहे. राजीव त्याचे उदाहरण ठरले. राजकारणाची एकाअर्थी ही भयानक अवस्था आहे. ’त्यांच्या या प्रतिक्रियेवर कसे व्यक्त व्हावे हा प्रश्‍न तेव्हाही पडला आणि आताही समोर आहे. विषयाची मांडणी करताना फक्त मूळ विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, हा उद्देश होता.

मुक्त अर्थव्यवस्थेनंतर जन्माला आलेल्या राजकारणाची धाटणी आणि मांडणी जवळपास सर्वच राजकीय पक्षांत एकसारखी आहे. त्यामुळे कोणा एकाला या अवस्थेसाठी दोषी धरणेही कठीण! अधिक धोकादायक आहे तो राजकीय व्यवस्थेतील ‘व्यवहार’! पक्ष नेत्याला वापरतात, नेते पक्ष वापरून घेतो. कार्यकर्ते नेत्याला वापरतात आणि नेते कार्यकर्त्याला वापरून घेतात, या व्यवहारावर गडाख यांनी बोट ठेवले. यावरही मोठी चर्चा झडली. मतदार, समाज, कार्यकर्ता आणि नेता अशा सर्वच स्तरांवर यावर आत्मपरीक्षणाशिवाय गत्यंतर नाही, असा अनेकांचा आग्रह! प्रत्येकाने आपल्यापासून त्याचा प्रारंभ करावा, याची जाणीवही प्रत्येकात होती, हे महत्त्वाचे.

काहींनी अनावश्यक राजकारण ढवळण्याचा प्रयत्न केला. राजीव यांच्यासोबत 2009 आणि 2014 मध्ये काय घडले, याबाबतची उत्सुकता त्यांच्यात उफाळून आलेली. निवडणुकांत ‘डिमांड’ करणारे ‘भिकारचोट’ राजकारणी कोण, येथपासून तर त्यांचे चेहरे समाजासमोर उघड झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह! अनेकांना ‘तो’ इतिहास चांगलाच माहीत असल्याचे चर्चेतून समोर आले. पण आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे हा खटाटोप एका समस्येची ओळख करून देण्यासाठी, समाज आणि राजकारणाला सावध करण्यासाठी होता.

कोणाचे चेहरे काय आहेत, हे आता समाजमनालाही चांगले अवगत आहे. त्यावर मिथ्या काथ्याकूट अनावश्यक.  त्याऐवजी व्यवस्थाबदल अधिक महत्त्वाचा! चर्चेतील दुसर्‍या भागात गडाख यांनी यावर प्रकाश टाकला आहे. तरुण नेत्यांना राजकारणातील धोक्यांची जाणीव करून देताना मन खंबीर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. दीर्घ चर्चेतील पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर एकप्रकारे हळहळ मिश्रित राग उमटला तर दुसरा भाग प्रसिद्ध झाल्यावर तरुण राजकारणीही अंतर्मुख झाल्याचे जाणवले.

अनेक युवा नेत्यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही चर्चा पुढे नेते आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यावरून हा विषय किती खोलवर घर करून होता, याचीही जाणीव झाली. विस्थापित असो की प्रस्थापित, आता सर्वच स्तरातील युवा नेत्यांनी गंभीर होणे क्रमप्राप्त आहे. गढूळ राजकारण घेऊनच पुढे जायचे का, हा त्यांच्यासमोरील प्रश्‍न आहे. कारण त्यांनाही आता या विदारक स्थितीचा सामना करत राहावा लागणार आहे.

चांगली माणसे मनाने हळवी असतात. मग राजकारणात आता केवळ निगरगट्ट लोकांनीच यावे का, असा प्रश्‍न गडाख यांनी अप्रत्यपणे उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर मात्र जनतेलाच शोधावे लागणार आहे. राजीव राजळे हे उमदे, कलासक्त, संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. वास्तुविशारद असल्याने निर्जीव भिंतींना जिवंत आणि प्रसन्न करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. म्हणूनच राजकारण आखीव, रेखीव, काटेकोर, स्वच्छ आणि प्रसन्न असावे, असा त्यांचा आग्रह होता. आपले स्वप्न ते मागे सोडून गेले आहेत. समाजासाठी नवे स्वप्न पाहाणार्‍या संवेदनशील आणि लढवय्या ‘राजीव’ना बळ देऊया!!

मातब्बर राजकीय घरांतूनही अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया उमटली. अस्वस्थता तेथेही आहेच! वंशपरंपरेप्रमाणे राजकीय वारसा मिळाला आणि सोबत वादही आले. परिस्थिती बदलली आहे. हेवेदावे कुठेतरी थांबावेत, हे त्यांच्याही मनात. पण पुढाकार कोण घेणार, याबद्दल साशंकता! ते या अंगाने व्यक्त होण्यास तयार झाले, ही यातील एक नोंद घेण्यासारखी बाब!  

भावनेला वाट मोकळी करुन देण्यास उशीर झाला, अशीही प्रतिक्रिया या दरम्यान उमटली. तीही स्वीकारली पाहिजे. राजीव राजळे यांना समजून घेण्यात आपण कमी पडलो. समाज, नेते, पक्ष अशा सर्वच स्तरांवर याचा विचार झाला पाहिजे. तरुण नेत्यांशी ज्येष्ठांचा ‘अबोला’ एका गंभीर अवस्थेला जन्म देतो. त्यामुळे आता वडिलधार्‍यांनीच नव्या पिढीला दिशा देताना आपले ‘मोठेपण’ बाजूला ठेवले तर काही बिघडणार आहे का? असा एक प्रश्‍नही या दरम्यान उपस्थित झाला.

LEAVE A REPLY

*