अहमदनगर : कोपर्डी प्रकरण : काऊंटडाऊन.. : फाशी नको जन्मठेप द्या; शिंदेची मागणी

0

अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. दोषींना शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद सुरू झाला. दोषींना फाशी की जन्मठेप याची उत्सुकता जिल्ह्यासह राज्याला लागून आहे. दरम्यान मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने फाशी नको जन्मठेप द्या अशी विनवणी कोर्टासमोर केली.

आरोपी नितीन भैलूमेचे वकील प्रकाश आहेर यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. या संदर्भात आरोपी नितीन भैलुमेला न्यायालयाने तुला काही सांगायचे का असे विचारल्यावर हात जोडून त्याने मी निर्दोष असल्याचे सांगितले. नितीन भैलुमेविरोधात कोणताही साक्षी पुरावा नाही, त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता असे आहेर यांनी युक्तीवादात सांगितले.
जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अ‍ॅड. मोहन मकासरे यांनी त्याच्यावतीने युक्तिवाद केला. कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. मी तिला मारलं नाही, असा दावा मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा कोर्टात केला. फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी त्याने केली. उज्ज्वल निकम उद्या युक्तीवाद करणार आहेत.
दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.

  • आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते.

 

LEAVE A REPLY

*